आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cultural News In Marathi, Dilip Prabhawalkar Performed Without Make Up, Divya Marathi

मेक अप न करता केले सशक्त पात्रांचे सादरीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक अप करून साकारलेल्या कठीण व आव्हानात्मक पात्रांचा नजराणा दिलीप प्रभावळकर यांनी मेकअप न करता सशक्तपणे सादर केला. प्रभावी अभिनयशैलीची झलक व त्यांच्या आव्हानात्मक भूमिकांमधील रोमांचकारी किश्श्यांनी प्रेक्षकांना रंगतदार मेजवानी दिली. व.वा.वाचनालयातर्फे शनिवारी प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांचा ‘चिमणराव ते गांधी’ हा दृकर्शाव्य एकपात्री प्रयोग गंधे सभागृहात झाला. या वेळी रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्टचे प्रकाश चौबे, विनोद अग्रवाल, प्रताप निकम, अँड.सुशील अत्रे, प्रा.चारुदत्त गोखले आदी उपस्थित होते. प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी सूत्रसंचालन केले.