आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cultural News In Marathi, Shiv Mohstav At Raisoni Engineering College, Divya Marathi

महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करा : पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन पुढे चला; अन्यथा वाईट प्रथेचे लोक आपली वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत’, ‘जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही,’ असे प्रतिपादन रामचंद्र पाटील यांनी केले.
रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी झालेल्या ‘शिवमहोत्सव 2014’ या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महाविद्यालय परिसरात मिरवणूक काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील जिवंत देखावे सादर केले. याप्रसंगी प्रतीक्षा कोरगावकर, प्राचार्य डॉ. प्रभाकर भट, डॉ. प्रीती अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महापुरुषांचा इतिहास आपणास महत्त्वाचा असून आपण महाराजांचा इतिहास आठवून त्यावर चिंतन केले पाहिजे. शिवजयंती केवळ मिरवणुकीपुरती न राहाता त्यांचे गुण अंगिकारले पाहिजे, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले. कोरगावकर यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.