आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Culture News In Marathi, Jalgaon University Music Department, Divya Marathi

उलगडलेलं वास्तव : ललित कलेच्या अंतरंगात ओढ विज्ञानाचीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गीत आणि अभिनय क्षेत्रातले दोन दिग्गज कलाकार शनिवारी जळगावात होते. प्रख्यात गायक अजित कडकडे हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगीत विभागात आले होते. तिथे त्यांनी रसिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सायंकाळी प्रख्यात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा ‘चिमणराव ते महात्मा गांधी’ हा एकपात्री प्रयोग गंधे सभागृहात झाला. वल्लभदास वालजी वाचनालयाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात दिलीप प्रभावळकरांनीही आपले अंतरंग मोकळे केले. दोघांनीही आपली खरी इच्छा वेगळीच होती हे बोलून दाखवलं. दोघेही कलाकार; पण दोघांनाही ओढ होती ती विज्ञानाची. त्याविषयीचे मनोगत त्यांच्याच शब्दात.