आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वड्याचा राग मालकावर; पैसे मागितल्याने मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - साबूदाणावड्याचे पैसे मागितल्याचा राग येऊन व्यावसायिकास त्याच्या काकास मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी वाजता महापालिका कार्यालयामागील गल्लीत घडली. सुनील भाऊलाल पिसाळ (वय ४५, काळेनगर, शिवाजीनगर परिसर) याने हातगाडी व्यावसायिकाकडून साबुदाणा वडा घेतला. त्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने सुनील पिसाळ याने व्यावसायिकास शिवीगाळ केली. या वेळी दोघांमधील वाद सोडवण्यास गेलेल्या व्यावसायिकाच्या काकास सुनील पिसाळ याने लाकडी दांड्याने डोक्याला मारहाण करीत जखमी केले. व्यावसायिक महेश दुबे (वय २०, इंद्रप्रस्थनगर) याने शहर पोलिस ठाण्यात याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात गर्दी होऊन वाहतूक खोळबंली होती.
साबुदाणा वड्याचे पैसे देण्यावरून रस्त्यावर अशी सिनेस्टाइल हाणामारी सुरू होती.