आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वितरणप्रणालीत सुधारणा: घरोघरी जाऊन सिलिंडर तपासणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे: प्रशासनामार्फत घरोघरी जाऊन गॅस सिलिंडरची तपासणी करण्यात येणार आहे. यादरम्यान ग्राहकांकडून एबी फॉर्म भरून घेण्यात आले होते. एबी फॉर्मची माहिती संकलित करून ते जमा करण्याचे आदेश तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी गॅस एजन्सीचालकांना दिले. गॅस वितरणप्रणालीत सुधारणा व्हावी व नागरिकांना चांगली सेवा मिळावी या उद्देशाने शुक्रवारी तहसील कार्यालयात गॅस एजन्सीचालकांची बैठक घेण्यात आली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. या वेळी गॅस वितरणाच्या सुधारणांवर चर्चा करण्यात आली.
शहरातील गॅस वितरणप्रणालीत सुधारणा होऊन नागरिकांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने शुक्रवारी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला पुरवठा निरीक्षक ए.वाय.उपासनींसह शहरातील दहा गॅस एजन्सीचालक उपस्थित होते. या वेळी तहसीलदार आवळकंठे यांनी गॅस वितरणसंबंधीचा आढावा घेतला. गॅस वितरणासंबंधीच्या तक्रारी वाढत असून, ज्या एजन्सींविरुद्ध जास्त तक्रारी येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. गेल्या दीड महिन्यापासून शहरात आणि ग्रामीण भागात गॅस सिलिंडरचा घरपोच पुरवठा केला जात आहे. यासह सर्व घटनांचा आढावा घेण्यात आला.तसेच शहरात घरपोच गॅसपुरवठा करण्यासंदर्भात सुधारणा होत असून, यापुढे ग्रामीण भागातदेखील घरपोच गॅसपुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर एजन्सीवर गैरप्रकार आढळून आल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. तसेच एकापेक्षा अधिक गॅस सिलिंडर शोधण्यासाठी लवकरच घरोघरी जाऊन गॅस सिलिंडरची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यासाठी गॅस एजन्सींकडून भरून घेण्यात आलेल्या एबी फॉर्मचा फायदा होणार असल्याने या वेळी प्रत्येक एजन्सीचे फॉर्म, कंपनीची संख्या, किती ग्राहकांनी जमा केले कितींचे बाकी आहेत आदी माहितीनुसार पुढील कारवाई होणार आहे.