आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओमनीत घरगुती सिलिंडरचा गॅस भरताना स्फोट; पती-पत्नी भाजले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिलिंडरच्या स्फोटात सुरक्षारक्षकाच्या घरातील वस्तूंचे झालेले नुकसान. - Divya Marathi
सिलिंडरच्या स्फोटात सुरक्षारक्षकाच्या घरातील वस्तूंचे झालेले नुकसान.
जळगाव - अाेमनी कारमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस भरताना गळती हाेऊन स्फाेट झाल्याची घटना साेमवारी सायंकाळी ५.३० वाजता एमअायडीसीतील ‘व्ही’ सेक्टरमधील ‘अरिहंत बेकरी’ या कंपनीत घडली. स्फाेटामुळे कार सुरक्षारक्षकाचे घर पूर्णपणे खाक झाले अाहे. तसेच कंपनीचा सुरक्षारक्षक त्याची पत्नी गंभीररीत्या भाजले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे.

ललित गणेशमल जैन यांची एमअायडीसीतील ‘व्ही’ सेक्टर(१८२)मध्ये ‘अरिहंत बेकरी’ ही कंपनी आहे. या बेकरीत तयार होणारे ब्रेड, खारी हे अाेमनी कार (क्र.एमएच-१९-एएक्स-१३३२)मधून शहरातील व्यापाऱ्यांकडे पोहाेचवण्यात येते. कंपनीच्या परिसरात प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षक आधार पाटील हे पत्नी उषा मुलगा शुभमयांच्यासह राहतात. पाटील हे या बेकरीतच, तर त्यांची पत्नी चटईच्या कंपनीत कामाला अाहे. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता आधार पाटील हे त्यांच्या घरात ठेवलेल्या घरगुती सिलिंडरला मोटार लावून नळीच्या साह्याने ओमनीच्या टाकीत गॅस भरत हाेते. मात्र, या वेळी अचानक गळती झाल्यामुळे नळीने पेट घेतला. त्यानंतर काही सेकंदांतच मोठा स्फोट झाला. या स्फोटात आधार पाटील उषा पाटील हे दांपत्य गंभीररीत्या भाजले. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक कंपनीतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाटील दांपत्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेत पाटील दांपत्य ५० टक्के भाजले असून, आधार पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे.

पुढे वाचा, डीव्हीआर ताब्यात, कंपनी मालकावर गुन्हा
बातम्या आणखी आहेत...