आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिलिंडरच्या स्फाेटाने पंखे वाकले अन‌् फ्रिज जळाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - देवपुरातील जानकी नगरात सकाळी सिलिंडरचा स्फाेट झाला. या घटनेत स्वयंपाक घरातील फर्निचर जळून खाक झाले. मात्र, सुदैवाने काेणतीही माेठी दुर्घटना घडली नाही.
जानकी नगरातील प्लाॅट नं. येथे अभियंता विजय भदाणे यांचा अयोध्या बंगला अाहे. त्यांच्या पत्नी उज्ज्वला भदाणे ह्या सकाळी वाजता घरी गॅसवर चहा करीत असताना अचानक स्फाेट झाला. त्यामुळे त्या घाबरून बाहेरच्या खाेलीत आल्या. विजय भदाणे यांनी तत्काळ अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. बंब काही क्षणात घटनास्थळी दाखल झाला. बंबाच्या मदतीने अागीवर नियंत्रण मिळविण्यात अाले. काही क्षणात अागीवर नियंत्रण मिळविल्याने माेठी दुर्घटना घडली नाही. मात्र, यात स्वयंपाक घरातील फर्निचर, फ्रिज, पंखा अादी साहित्याचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले अाहे.

तीस ते चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात अाहे. त्याबाबत पाेलिसांत काेणतीही नाेंद करण्यात अालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...