आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तवारी मार्केटमध्ये गॅस सिलिंडरचा स्फाेट; ५० हजारांचे साहित्य खाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मार्केटसमोरील तिवारी मार्केटमधील कल्याणी कॉम्प्युटर्स या दुकानात शुक्रवारी पहाटे वाजता गॅस सिलिंडरचा स्फाेट झाला. त्यात कल्याणी कॉम्प्युटर्समधील सुमारे ५० हजारांचे साहित्य अन्य दाेन दुकानांचे फलक जळून खाक झाले. तिवारी मार्केटजवळ ला.ना.शाळा, स्टेट बँक उत्पादन शुल्कचे कार्यालय असल्याने परिसरात प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे ही घटना दिवसा घडली असती तर प्रचंड हाहाकार माजला असता. दरम्यान, गॅस सिलिंडरचा स्फाेट हाेण्याची ही अाठवडाभरातील तिसरी घटना अाहे.
तिवारी मार्केटमध्ये दुकान क्रमांक तीन हे आनंद नारायण तिवारी (बालाजीपेठ) यांच्या मालकीचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी छाया आनंद तिवारी मुलगा आकाश यांची त्या दुकानावर मालकी आहे. आनंद तिवारी यांनी कर सल्लागार विजय शांतीलाल सेठ यांना १६ मार्च २००३पासून हे दुकान १५०० रुपये महिना भाडेतत्त्वावर दिले आहे. या दुकानात सेठ यांनी पत्नीच्या नावे कल्याणी कॉम्प्युटर्सचे कार्यालय सुरू केलेले आहे. मात्र, या दुकानात दरराेज रात्री सेठ यांचे भाऊ अशाेक सेठ हे व्यवसाय अाटाेपल्यानंतर नाश्ताची लाेटगाडी दाेन गॅस सिलिंडर ठेवतात. त्यातील एका सिलिंडरचा शुक्रवारी पहाटे वाजता दुकानात स्फोट झाला. त्यामुळे दुकानाचा वरचा मजला जळाला उजव्या बाजूच्या भिंतीला माेठे भगदाड पडले. तसेच दुकानातील वीजमीटर, कॉम्प्युटर्स, प्रिंटर, कॉम्प्युटर टेबल, तीन लाकडी कपाटे, लोटगाडी त्यावरील इतर साहित्य असे सुमारे ५० हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अागीचे लाेळ दिलीप विविध उद्योग वरद ट्रॅव्हल्सच्या कार्यालयापर्यंत पाेहाेचल्याने दाेघांच्या कार्यालयांचे फलकही जळाले आहेत. या अागीबाबत नागरिकांनी अग्निशमन दलाला तत्काळ माहिती दिल्याने दाेन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच अाग विझवल्याने इतर दुकाने वाचली. तिवारी मार्केटजवळ ला. ना. शाळा, स्टेट बँक उत्पादन शुल्कचे कार्यालय असल्याने या परिसरात प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे ही घटना दिवसा घडली असती तर माेठा अनर्थ घडला असता.

वादातून आग लावल्याचा आरोप
दुकानाच्याभाड्याबाबत तिवारी यांनी लिखित स्वरूपात पावती दिल्याने हा वाद निर्माण झाला अाहे. १५ दिवसांपूर्वी अजय पुराेहित याने दुकान खाली केल्यास दुकानातील सर्व साहित्य जाळून टाकण्याची धमकी दिली हाेती. त्यानंतर शुक्रवारी जाणीवपूर्वक अाग लावून दुकान जाळल्याचा अाराेप विजय सेठ यांनी केला अाहे. मी दुकानात एमडीएस ड्रिप सिस्टिम लावलेली अाहे. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा प्रश्नच नाही, तिवारी यांनी दुकानाच्या भाड्याबाबत लिखित स्वरूपात पावती दिली तर आपण त्यांना भाडे देण्यास तयार आहोत, असे सेठ यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात तक्रार अर्जही दिला अाहे.

दुकानाच्या भाड्याचा वाद पोहोचला पोलिसांत
अानंदितवारी यांच्या निधनानंतर विजय सेठ यांनी दुकानाचे भाडे दिलेले नाही. तसेच भाडे मागण्यास गेलाे असता, अशाेक सेठ इतरांनी तीन वेळा मारहाण केल्याचे अानंद तिवारी यांचा मुलगा अाकाश भाचा अजय पुराेहित यांनी सांगितले. याबाबत डिसेंबर २०१४ रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अशोक सेठ यांच्याविरुद्ध विनयभंग १९ जानेवारी २०१६मध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच विजय सेठ यांनी थकित भाडे देऊन दुकान खाली करून द्यावे, अशी मागणी छाया तिवारी आकाश तिवारी यांनी केली अाहे.

जिल्हा पुरवठा विभागाकडून कारवाई नाही
आठवडाभरात गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याची ही तिसरी घटना अाहे. एमआयडीसीतील बेकरीच्या कंपनीत अाेमनीमध्ये मोटारीने गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यात कामगार दांपत्य गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रिधूरवाड्यात नाश्ता तयार करताना गॅसगळती हाेऊन स्फाेट झाला. अाता कल्याणी कॉम्प्युटर्समध्ये स्फाेट झाला. गॅस सिलिंडरचा काळाबाजार गॅसच्या वापराबाबत निष्काळजीपणा होत असल्यानेच अशा घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेतत असून, मालमत्तेचे नुकसान होत आहे. मात्र, याप्रकरणी पुरवठा विभागाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.

घटनेनंतर सिलिंडर गायब
विजयसेठ यांचे भाऊ अशाेक सेठ हे नवीन बसस्थानकाजवळ नाश्त्याची गाडी लावतात. व्यवसाय अाटाेपल्यानंतर ते रात्री लाेटगाडी दाेन सिलिंडर हे कल्याणी काॅम्प्युटर्समध्ये ठेवतात. घटनेच्या दिवशीदेखील त्यांनी गाडी सिलिंडरमध्ये ठेवले हाेते. त्यापैकी एका सिलिंडरचा स्फाेट झाला. मात्र, शुक्रवारी सकाळी हे दाेन्ही सिलिंडर घटनास्थळावरून गायब हाेते.