आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिष दाखवल्यावरही डीएडच्या जागा रिक्तच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शिक्षकाची नोकरी हमखास मिळवून देणारा अभ्यासक्रम अशी ओळख असलेल्या डीएडची क्रेझ आता पूर्णत: ओसरली आहे. जिल्ह्यातील ३८ डीएड महावदि्यालयातील एक हजार ८०० पैकी यंदा केवळ ४१४ जागा भरल्या गेल्या आहेत. उर्वरित जागा संस्थास्तरावर भरणे अपेक्षित होते. या जागा भरण्यासाठी संस्थाचालकांनी एक ना अनेक शकली लढवल्या तसेच वदि्याथ्याना आमिष दाखले; परंतु अद्यापही जागा रिक्त आहेत. त्यामुळे आता काही संस्थाचालक डीएड महावदि्यालये बंद करण्याच्या तयारीत आहेत.

महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेतर्फे डीटीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आली; परंतु अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळेलच याची हमी नसल्याने वदि्यार्थ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावे, असे निर्देश प्रवेशप्रक्रियेच्या आधीच महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेने दिले. त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेणा-यांची संख्या यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे. जिल्ह्यात ३८ डीएड महावदि्यालये असून, त्यात हजार ८०० जागा आहेत. आतापर्यंत केवळ ४१४ जागा भरल्या गेल्या आहेत. उर्वरित जागा महावदि्यालयस्तरावर भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

डीएड महाविद्यालयातील सर्व जागा भरून मान्यता टिकवून ठेवण्यासाठी संस्थांचालकांनी आटापिटा केला. मात्र, वदि्यार्थी आमिषाला बळी पडत नसल्याने संस्थाचालकांची पंचाईत झाली आहे. जागा रिक्त असल्याने महावदि्यालय या वर्षी बंद करण्याच्या निर्णयापर्यंत संस्थाचालक पोहोचले आहेत. काही संस्थाचालक महावदि्यालय सरेंडर करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान अद्याप जिल्ह्यातील एकाही संस्थेने महावदि्यालय बंद करण्याविषयी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडे प्रस्ताव सादर केलेला नसल्याची माहिती देण्यात आली.

३८ - डीएड महावदि्यालये
४१४
जागांवर प्रवेश - १८००
जागा महाविद्यालयांत - 0४

वर्षांपासून स्थिती
- डीएड अभ्यासक्रम २००६ नंतर पूर्ण करणा-या वदि्यार्थ्यांना नोकरीची आशा नाही.
- शिक्षणसेवक प्रवेश परीक्षा २००९ नंतर घेण्यात आलेली नाही.
- एससीईआरटीने डीएड महावदि्यालयांची मान्यता शिथिल केल्यामुळे खेडोपाडी महावदि्यालयांची स्थापना.
- दरवर्षी डीटीएड करणा-या वदि्यार्थ्यांची संख्या वाढली पण नाेकर भरती बंद.
- कर्मचा-यांसमोर रोजगाराचा प्रश्न.
- शिक्षण संस्थामधील भरती प्रक्रिया बंद असल्याने डीएड पात्रता धारक बेरोजगार.
बातम्या आणखी आहेत...