आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशप्रक्रियेनंतर दाेन महिन्यांतच परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बी.एड.अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता वाढवण्याच्या नादात शासनाने यंदा ऑक्टोबर महिन्याच्या १० तारखेपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू ठेवली. त्यामुळे दोन महिने उशिराने महाविद्यालये सुरू झालीत. परंतु, पहिल्या सत्राची परीक्षा नेहमीच्याच वेळेत होत असल्यामुळे मात्र, विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसून काही विषयांची पुस्तकेही अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे बी.एड.चे विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत.

इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत यंदा बी.एडसाठी विद्यार्थी उपलब्ध होत नव्हते. यासाठी शासनाने प्रवेशप्रक्रियेला अनेकवेळा मुदतवाढ दिली; तर पात्रता परीक्षाही उशिराने झाली. तसेच काैंसिलिंग राऊंडही जास्त दिवस चालवला. परिणामी, जुलै महिन्यात आटोपणारी प्रवेशप्रक्रिया १० ऑक्टोबरपर्यंत चालली. त्यानंतर प्रवेशित विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले. आता वर्ग सुरू होऊन केवळ एक महिनाच उलटला आहे. तेवढ्यात १० डिसेंबरपासून परीक्षा सुरू होणार असल्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आता एका महिन्यात विद्यार्थ्यांना पहिल्या सत्राचा अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. महाविद्यालये विद्यापीठ मात्र या बाबतीत शासनाकडे बोट दाखवून मोकळे झाले आहेत.

पुस्तकेही नाहीत : यावर्षापासून बी.एड.चा अभ्यासक्रम एकाऐवजी दोन वर्षांचा केला अाहे. त्यामुळे अभ्यासक्रमातही मोठे बदल झाले अाहेत. काही विषयांची पुस्तकेही बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. त्या विषयांचा अभ्यास कोठून करायचा? हा मुख्य प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. याबाबत विद्यार्थ्यांना महाविद्यालये तसेच विद्यापीठाने काहीतरी मार्गदर्शन करावे? अशी मागणी हाेत आहे.

इतर विद्यापीठाचा सकारात्मक निर्णय
शासनाने प्रवेशप्रक्रिया उशिरापर्यंत सुरू ठेवल्यामुळे राज्यातील काही विद्यापीठांनी बी.एड.च्या पहिल्या सत्राची परीक्षा डिसेंबरमध्ये घेतली नाही. त्यांनी पहिल्या दुसऱ्या सत्राची एकत्रित परीक्षा मार्च महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार १० डिसेंबरपासून पहिल्या सत्राची परीक्षा सुरू होणार अाहे. यासंदर्भात महाविद्यालयांनीही विद्यापीठाला कळवणे आवश्यक होते. मात्र, तसे झाल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबरमध्येच परीक्षेला सुरुवात होणार अाहे.

पाठपुरावा करणार
^इतर विद्यापीठांनी पहिल्या सत्राची परीक्षा डिसेंबरमध्ये घेता मार्चमध्ये दुसऱ्या सत्रासोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. उमविनेही तसा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत. त्यासंदर्भात पाठपुरावा करणार आहोत. डॉ.नारायणखडके, प्राचार्य,सद्गुरू महाविद्यालय

वेळापत्रक जाहीर
^शासनाच्या नियमानुसार उशिरापर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहिली. विद्यापीठाच्या सत्र पद्धतीनुसार डिसेंबर महिन्यात परीक्षा होणे अपेक्षित आहे. त्यानुसार आम्ही महिनाभर आधीच वेळापत्रक जाहीर केले आहे. डॉ.धनंजय गुजराथी, परीक्षानियंत्रक, उमवि