आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dada Wani Arrested In The Case Of Liquor Storage

मद्यसाठाप्रकरणी दादा वाणीला कोठडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - पळासनेर शिवारात जप्त केलेल्या मद्यसाठाप्रकरणी आणखी तिघांना अटक झाली आहे. या तिघांसह प्रवीण उर्फ दादा वाणीला काल दुपारी धुळे न्यायालयात हजर करण्यात आले. प्रवीणची न्यायालयीन कोठडीत, तर इतर तिघांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.

शिरपूर तालुक्यातील पळासनेरपासून जवळच असलेल्या चारणपाडा शिवारातील भिवानी ढाब्यावर 24 फेब्रुवारीला कारवाई झाली. या वेळी एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला होता. याप्रकरणी सात जणांना त्याच दिवशी, तर उर्वरित पाच जणांना एलसीबीने अटक केली होती. घटनेनंतर पसार झालेला कथित मद्यसम्राट प्रवीण वाणीला शहाद्यात अटक झाली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपली असून, न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी झाली आहे. दरम्यान, फरार बंटी बन्सी भील, छोटू राजपूत व अन्य एकाला धुळे एलसीबीने अटक केली आहे. या तिघांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


सलीम आज कोर्टात
पोलिस वसाहतीत मिळून आलेल्या मद्यसाठा प्रकरणातील संशयित आरोपी सलीम शेख उर्फ सलीम लंबूच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.