आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मशाळेच्या जागेत रेडक्रॉस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अनेक वर्षापासून बंद असलेल्या व नुकत्याच शासनाने ताब्यात घेतलेल्या रेल्वे स्थानका जवळील मुलजी जेठा धर्मशाळेच्या जागेत लवकरच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कार्यालय हलणार असून त्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या असून पुढील आठवड्यापासून इमारतीच्या डागडूजीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
रेल्वे स्थानकाजवळील वादग्रस्त ठरलेल्या सिटी सर्व्हे नंबर 2124 मधील मुलजी जेठा धर्मशाळेची सरकारची जागा प्रशसनाने सन 2001 मध्ये शासन जमा केली आहे. तेव्हा पासून पडून असलेल्याया जागेचा उपयोग शासकीय कामांसाठी करुन घेण्यासाठी या ठिकाणी तलाठी आॅफीस व महाईसेवा कार्यालय स्थलांतरीत करण्याच्या दृष्टीने गेल्या महिन्यात प्रक्रीया सुरु होती. यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाला इमारतीच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेशही करण्यात आले होते. मात्र अचानक हा विचार मागे पडून आता रेडक्रॉस सोसायटीला देण्याच्या हालचालींना गती आली आहे. त्या दृष्टीने जागेची शनिवारी रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष चंदनमल राठी, चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, डॉ. विजय चौधरी, सह मानद सचिव गनी मेमन, समितीचे सदस्य राजेश यावलकर यांनी पाहणी केली.
रेडक्रॉस सोसायटीतर्फे नवीन अद्यावत इमारत बांधकाम करण्यात येत असल्याने एक ते दिड वर्ष कालावधीसाठी पदाधिकाºयांकडून पर्यायी जागेचा शोध सुरु आहे. रेडक्रॉसच्या पदाधिकाºयांतर्फे महापालिकेकडे महिनाभरापूर्वीच शाहू रुग्णालयातील रिक्त असलेली जागा मिळण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. जागा देण्यास महापालिका प्रशासन अनुकूल असतांना त्या ऐवजी शहरातील मध्यवर्ती भागातील जागा मिळाल्यास ग्राहकांच्या सोयीच्या दृष्टीने रेडक्रॉसच्या पदाधिकाºयांचा प्रयत्न सुरु आहे. पुढील आठवड्यापासून इमारतीच्या डागडूजी व रंगरंगोटीच्या कामाला प्रारंभ होईल.
द्यायला हरकत नाही
रेडक्रॉस सोसायटीतर्फे शाहू रुग्णालयाच्या खोल्यांचे भाडे देण्यापेक्षा धर्मशाळेच्या काही भागाची मागणी करण्यात आली आहे, याबाबतचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. एक ते दीड वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना ही जागा हवी आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नसून तळमजला द्यायला हरकत नाही. तलाठी व महा-ई सेवा कार्यालयासाठी जागा देण्याचाही विषय प्रशासनासच्या विचाराधीन आहे.
ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी
जागा हडपण्याचा डाव
सरकारी मालमत्तेची ही जागा असून प्रचंड पाठपुरावा व न्यायालयीन लढा दिल्यानंतर ही सरकार जमा झाली आहे. सुमारे 50 ते 60 कोटी रुपये किंमतीची ही जागा हडपण्यासाठी आजही विविध गट प्रयत्नशील आहेत. सरकारची मालमत्ता माझ्यामुळे परत मिळाल्याने द्यायचीच असल्यास मला दहा टक्के जागा द्यावी. या जागेत शासकीय कार्यालय हलवीणे रास्त वाटत नसल्यास शासकीय कर्मचाºयांसाठी रेस्ट हाऊस म्हणून तीचा उपयोग करावा मात्र अन्य संस्थांना ती देण्याचा घाट घातला गेल्यास संबंधीतांवर फौजदारी कारवाई साठी प्रयत्न करणार.
उल्हास साबळे, माजी नगरसेवक