आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात ‘गोविंदा’च्या गजरात फुटल्या दहीहंड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ‘गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रज बाला..’चा जयघोष करीत शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयांत दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला.

आर.आर.विद्यालय
आर.आर.विद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, भा.का.लाठी विद्यामंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मिळून दहीहंडी उत्सव साजरा झाला. अध्यक्षस्थानी अरविंद लाठी होते. उपाध्यक्ष अविनाश लाठी, सचिव मुकुंद लाठी, घनश्याम लाठी, विजय लाठी, र्शद्धा लाठी, प्रतिभा पाटील, प्राचार्या सोनाली रेंभोटकर, विजया काबरा, पंकज कुळकर्णी, अनिल चव्हाण उपस्थित होते. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या झांजपथकाने आकर्षक कसरती सादर केल्या. 50 विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडली. सांस्कृतिक प्रमुख डी.बी.साळुंखे, जयांशू पोळ, विद्या कलंत्री, विजय रोकडे, संजय पिले, संजय क्षीरसागर, के.डी.शेलकर, टी.बी.पांढरे, एल.जी.भारुळे, प्रांजली रस्से उपस्थित होते.

रायसोनी शिशुविहार शाळा
बीयूएन रायसोनी शिशुविहार शाळेतील चिमुरड्यांनी दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. या वेळी मुख्याध्यापिका नलिनी शर्मा, मुख्याध्यापक चंद्रशेखर उपस्थित होते. जयर्शी अकोले, योगिता माळी, अंजली बागुल, आरती बाविस्कर, सोनाली बडगुजर, लिना पाटील यांनी सहकार्य केले.

बी.एम.जैन विद्यालय
स्व.शेठ बी.एम.जैन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका हेमलता नेरपगारे यांच्या अध्यक्षतेखाली जन्माष्टमी उत्सव साजरा झाला. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, गवळणी, दहीहंडी कार्यक्रम झाला. दहीहंडीच्या विविध गीतांवर चिमुकल्यांनी ठेका धरला होता. देवयानी जाधव, चित्रा चौधरी, विष्णू साबळे, रवींद्र पाटील यांनी सहकार्य कले.

के.सी.इंग्लिश मीडियम
के.सी.इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी दहीहंडी फोडत उत्सव साजरा केला. संस्थेचे संचालक प्रशांत कुळकर्णी, माधुरी कुळकर्णी, र्शद्धा काटकर, अर्चना मस्के उपस्थित होते.

जॅक अँड जिल प्ले ग्रुप
पिंप्राळा येथील जॅक अँड जिल या प्ले ग्रुपमध्ये राधा-कृष्णाची वेशभूषा स्पर्धा झाली. यात प्रथम क्रमांक अनंत गणेश बारी याने तर राधाच्या वेशभूषेत सिया कपूर हिने प्रथम क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ राघव जाखेटे व र्शीप्रसाद जाधव यांना मिळाले.

65 फुटी दहीहंडीसाठी रचले चार थर
तरुण कुढापा मंडळाने फोडली दहीहंडी
युवा शक्ती फाउंडेशनतर्फे आयोजित 65 फुटी ‘महादहीहंडी’ला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी काव्यर}ावली चौकास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अमळनेरच्या सिद्धार्थ मित्र मंडळाच्या 150 ढोल-ताशांच्या गजरात तरुणाई थिरकली. तसेच विवेकानंद शाळेतील मुलींनी गोपनृत्य सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबादचे आयकर आयुक्त बी.पी.सिंग, ललित कोल्हे, महापौर किशोर पाटील, सिंधू कोल्हे, चंदन कोल्हे, फाउंडेशनचे अध्यक्ष, विराज कावडीया, अनुज जगताप उपस्थित होते. शहरातील तरुण कुढापा मित्र मंडळाने सुरुवात करत चार थर रचले. काठीच्या साहय़ाने दहीहंडी फोडण्याचा मान त्यांनी मिळवला. क्रेनला दहीहंडी लावण्यात आली होती; मात्र 65 फुटांची ही दहीहंडी फोडण्यास सहा वेळा अपयशी ठरल्यानंतर क्रेन खाली करून तरुण कुढापाने ती फोडली. स्वाती मेटकर यांनी सूत्रसंचालन केले.

येथे ही झाले कार्यक्रम
श्रीराम प्राथमिक विद्यालय मेहरूण, नथूशेठ चांदसरकर, निर्मलाताई पी.पाटील वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज, उज्ज्वल्स स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूल, अभिनव विद्यालय, प्रगती विद्यामंदिर, अभिनव प्राथमिक विद्यालय, महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रायसोनी फन स्कूल, चांदसरकर डी.एड.कॉलेज, समाजकार्य महाविद्यालय, विद्या इंग्लिश मीडियम स्कूल.