आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडीचा जल्लोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘गोविंदा आला रे आला... जरा मटकी संभाल ब्रिजबाला!’ असा नारा देत थरांवर थर लावत शहरातील गोविंदांनी जागोजागी दहीहंडी फोडली. तेवढ्याच उत्साहात जळगावकरांनीही दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. डीजे आणि वेगवेगळ्या तालावर नृत्य करून आनंद द्विगुणित केला. आकर्षक विद्युत रोषणाई... गोविंदांचा उत्साह... पाहणार्‍यांची गर्दी... असे चित्र दहीहंडी उत्सवात दिसून आले. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात वावरणार्‍या महिलाही दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या, हे विशेष.

श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यानुसार यंदाही गोविंदांसह भाविकांमध्ये दहीहंडीच्या उत्साहाला उधाण आले होते. शहरात पाच मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. त्यातील कोल्हे नगरातील दहीहंडी महिलांनी फोडली.

सागर पार्कवर लेझर शोद्वारे रंगबेरंगी रोषणाईत परिसर झगमगूून गेला होता. जी.एस.ग्राउंडवर दहीहंडीवेळी ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती करण्यात आली. येथे क्रेन मशीनद्वारे दहीहंडी उभारण्यात आली होती.
येथे झाले कार्यक्रम

मंडळाचे नाव : एल.के.फाउंडेशन, अ.भा.लेवा पाटीदार, पुष्पांजली फाउंडेशन, ललित कोल्हेनगर
फोडणार्‍या गोविंदाचे नाव :
जयेश चौधरी
कितवा थर : पहिला
कितव्या प्रयत्नात : पहिल्याच
वेळ : 5.10 वाजता
उपस्थिती : माजी महापौर आशा कोल्हे
वैशिष्ट्य : महिलांचा सहभाग

मंडळाचे नाव : मनसे व एल.के.फाउंडेशन, सागर पार्क
फोडणार्‍या गोविंदाचे नाव : भय्या चौधरी, तरुण कुढापा मंडळ
किती थर : चार
कितव्या प्रयत्नात : तिसर्‍या
किती वाजता : रात्री 9.32 वाजता
उपस्थिती : आमदार गुरुमुख जगवाणी, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, महापौर राखी सोनवणे, डॉ.सी.जी.चौधरी व मनसे पदाधिकारी
वैशिष्ट्ये : लेझर शो, आतषबाजी, पाण्याचे फवारे, के्रनवर दहीहंडी

मंडळाचे नाव : सुभाष चौक मंडळ
फोडणार्‍या गोविंदाचे नाव : बाळू पाटील, श्रीराम तरुण मित्र मंडळ
किती थर : चार
कितव्या प्रयत्नात : तिसर्‍या
किती वाजता : 7.17 वाजता
बक्षिसाची रक्कम: 11001 रुपये
उपस्थिती : आमदार गुरुमुख जगवाणी, सुरेश भोळे, श्रीकांत खटोड, मनीष अग्रवाल, अनुप अग्रवाल
वैशिष्ट्ये: हंडी फोडण्यासाठी होते एक लाखाचे बक्षीस.

मंडळाचे नाव : नेहरू चौक मित्र मंडळ
फोडणार्‍या गोविंदाचे नाव: दीपक ठाकरे (वय 28), तरुण कुढापा मित्र मंडळ
किती थर: तीन थर
कितव्या प्रयत्नात: तिसर्‍या
वेळ: रात्री 8.58 वाजता
बक्षिसाची रक्कम: 2100 रुपये

उपस्थिती: पालिकेचे सभागृहनेते रमेश जैन, उपमहापौर सुनील महाजन, ‘दिव्य मराठी’चे डेप्यूटी एडिटर त्र्यंबक कापडे, लोकमतचे प्रवीण चोपडा, नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, श्यामकांत सोनवणे, गजानन मालपुरे, सुरेश भोळे, विष्णू भंगाळे, अजय गांधी, रिकेश गांधी, मोहन तिवारी.
वैशिष्ट्ये: के्रनवर दहीहंडी, दहीहंडी फोडणार्‍या आणि नाचणार्‍या कार्यकर्त्यांवर पाण्याचे फवारे मारले जात होते.

मंडळाचे नाव : युवाशक्ती फाउंडेशन, काव्यरत्नावली चौक
फोडणार्‍या गोविंदाचे नाव : प्रमोद पाटील, श्रीराम मित्र मंडळ
कितवा थर : चार
कितव्या प्रयत्नात : तिसर्‍या
वेळ : 4.45 वाजता.
बक्षिसाची रक्कम : 5100 रुपये
उपस्थिती : पोलिस अधीक्षक जे.डी.सुपेकर, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील