आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हेल्मेट’साठी पोलिस अधीक्षकांचे सोशल मीडियावर प्रबोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महामार्गावरहेल्मेट वापरल्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना अपघातात आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटना रोखण्यासाठी दीड महिन्यापासून महामार्गावर दुचाकीधारकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. एवढेच नव्हे तर पोलिस प्रशासनाला कडक कारवाईच्या सूचना दिल्यानंतर कारवाईचा सपाटा सुरू झाला होता. रविवारी पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सोशल मीडियावरून एका चित्रफितीद्वारे नागरिकांना हेल्मेट वापरणे किती गरजेचे आहे, याबाबत प्रबोधन केले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दिवसभरात शहरात चांगलीच चर्चा होती.

वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासह महामार्गावर हेल्मेट सक्तीसंदर्भात पोलिस अधीक्षक डॉ.सुपेकर यांनी दीड महिन्यापासून कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. हेल्मेट वापरणाऱ्यांना दंडदेखील करण्यात येत आहे. याविषयी ‘दिव्य मराठी’ने देखील पुढाकार घेऊन वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महामार्गावर दुचाकीधारक पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने हेल्मेट वापरू लागले आहेत. याचा एक भाग म्हणून रविवारी तर पोलिस अधीक्षकांनी सोशल मीडियातून (व्हॉटस अॅप, फेसबुक) नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे.

एक मिनिट सेकंदांची ही व्हिडिओ िक्लप व्हॉटस अॅप, फेसबुकवरून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. त्यांची दिवसभरात चांगलीच चर्चा होती. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती होऊ लागली आहे. नागरिकही पोलिसांच्या आवाहनाला साथ देत महामार्गावर हेल्मेट वापरत आहेत.
डॉ. जालिंदर सुपेकर
सीडीचे विमोचन
रेखागॅस आणि लायन्स क्लब यांच्यातर्फे वाहतूक सुरक्षेसंदर्भात संदेशपर एक लघुपट तयार करण्यात आला आहे. या लघुपटाच्या सीडीचे विमोचन पोलिस अधीक्षक कार्यालयात नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी रेखा गॅसचे संचालक दिलीप चौबे, लायन्स क्लबचे अध्यक्ष कनकमल राका, पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर, वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, क्लबचे सचिव किरण गांधी, मल्हार कम्युनिकेशनचे सचिन घुगे उपस्थित होते. या लघुपटाची निर्मिती मल्हार कम्युनिकेशनतर्फे करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा
गेल्यामहिनाभरापासून शहर वाहतूक शाखेकडून महामार्गावर हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई केली जात आहे. आर्थिक दंड वसूल केल्यानंतरही काही वाहनधारक हेल्मेट वापरण्याची तसदी घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळे आता सोशल मीडीयाच्या माध्यमातून पोलिस थेट तरुणाईपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
काय आहे चित्रफितीत?
जनतेससुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचे पालन करा, रेड सिग्नल सुरू असताना झेब्रा क्रॉसिंगच्या मागे आपली वाहने उभी करा, ट्रिपल सीट प्रवास करू नका, जीवन अत्यंत सुंदर असून त्याला जपावे, जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था, महामार्गावरील अपघात, निष्काळजीपणे मोबाइलवर बोलत असताना दुचाकी चालवणे, ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेटशिवाय महामार्गावरून दुचाकीवर प्रवास यासारख्या प्रकारांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रतिकात्मक चित्रण या चित्रफितीत आहे. तर शेवटच्या अर्ध्या मिनिटात सुपेकर यांनी नागरिकांना आवाहन केले. तसेच महामार्गावर दुचाकी चालवत असताना हेल्मेटची सक्ती करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. रेखा गॅस एजन्सी, लायन्स क्लब आणि भारत गॅस यांच्या सौजन्याने ही चित्रफीत तयार करण्यात आली आहे.