आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Daily Two Quintals Plastic Collecting On Bhusawal Railway Junction

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळ जंक्शन स्थानकावर दररोज गोळा होतो दोन क्विंटल प्लास्टिकचा कचरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - जंक्शन स्थानकावर प्लास्टिकचा वारेमाप वापर होतो आहे. प्लास्टिक पिशव्या, द्रोण हे गाडी स्थानकावर थांबल्यानंतर रुळांवर फेकले जातात. दिवसाकाठी भुसावळ स्थानकावर कमीत कमी दोन क्विंटल प्लास्टिकचा कचरा गोळा केला जातो.

उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. खाद्यपदार्थांची पॅकिंग करण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. पदार्थ खाल्ल्यानंतर बहुतांश प्रवासी पॅकिंगचे प्लास्टिक हे स्थानकावरील कचराकुंडीत न टाकता जागा दिसेल तिथे फेकून देतात. फलाटांवरील गटारींत हा प्लास्टिकचा कचरा अडकल्याने दुर्गंधी पसरते. रेल्वे प्रशासनाने स्थानकावर घाण करणार्‍या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी धडक मोहीम राबविली पाहिजे, असा सूर पर्यावरणप्रेमींमधून उमटत आहे. फलाटावर गाडी थांबल्यावर प्रवाशांनीही खाद्यपदार्थांच्या पॅकिंगचा जो कचरा असतो तो स्थानकावरील कचराकुंडीच टाकला पाहिजे. मात्र, तसे होत नसल्याने येथील स्थानकावर प्लास्टिक कचर्‍याची समस्या बिकट बनत चालली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकावर प्लास्टिकचा वापर टाळण्याच्या सूचना केल्या असल्या तरी त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे चित्र फलाटांवर फेरफटका मारला असता दिसून येते. रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूच्या गटारीही प्लास्टिक कचर्‍यामुळे तुंबल्या आहेत.


विक्रेत्यांना दिल्या सूचना
लांब पल्ल्याचा प्रवास करणारे प्रवासी प्लास्टिकचा अधिक वापर करतात. प्लास्टिक बंदीसाठी चहासाठीही कागदाचा विघटन होणारा ग्लास वापरण्याची सक्ती केली आहे. प्रवाश्यांनीही प्लास्टिकचा वापर स्वयंप्रेरणेने टाळणे अपेक्षित आहे. मनोजकुमार र्शीवास्तव, स्थानक व्यवस्थापक


तर प्लास्टिक वापर थांबेल
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर थांबला पाहिजे. प्रवासी व रेल्वे प्रशासन दोघांनी मनस्वी निश्चय केला तर प्लास्टिकचा वापर थांबू शकतो. प्रशासनानेही दंडात्मक कारवाईचे पाऊल उलले पाहिजे. आशुतोष दलाल, पर्यावरणप्रेमी, नवशक्ती आर्केड