आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरराेज पचेल एवढेच खा! , अाहारतज्ज्ञ वैदेही नवाथे यांचा माेलाचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाहारतज्ज्ञ वैदेही नवाथे - Divya Marathi
अाहारतज्ज्ञ वैदेही नवाथे
जळगाव- अाराेग्याच्या बाबतीत अाज प्रत्येकाचे दुर्लक्ष हाेत अाहे. विविध कारणांमुळे अापल्या जीवनशैलीत दिवसेंदिवस बदल हाेत चालला अाहे. शरीराला हवे ते देण्यापेक्षा सध्या नकाे त्या गाेष्टी देण्यावर नागरिकांचा अधिक भर दिसून येताे. अाहारात खूप काही बदल करण्यापेक्षा शरीराला जे हवे अाहे, ते अाेळखून खावे. दरराेज पचेल एवढेच खाल्ल्यास अापले शरीर निराेगी राहते. त्याचबरोबर पावसाळ्यात आहार हा हलका घ्यावा. तसेच बाहेरील पदार्थ खाण्यापेक्षा ज्या परिसरात जे पिकते तेच खाल्ल्यास अाराेग्यासाठी ते अधिक लाभदायक ठरते, असा सल्ला अाहारतज्ज्ञ वैदेही नवाथे यांनी जळगावकरांना दिला.
वैद्य भालचंद्र शंकर जहागीरदार प्रतिष्ठानतर्फे गुरुपाैर्णिमेनिमित्त गंधे सभागृहात व्याख्यानमाला सुरू अाहे. रविवारी मुंबई येथील अाहारतज्ज्ञ वैदेही नवाथे यांच्या ‘अाहारमंत्र निरोगी अायुष्यासाठी’ विषयावर व्याख्यान झाले. या वेळी त्यांनी अाराेग्याच्या समस्या जाणून त्यांना विविध टिप्स दिल्या. त्याचे प्रत्येक नागरिकांनी काटेकाेरपणे पालन केले तर निश्चितच ताे सुखी अायुष्य जगू शकेल.

प्रत्येकपदार्थाची अावश्यकता
वैदेहीनवाथे यांनी अाराेग्याची काळजी घेत संतुलित अाहार कसा असावा अाणि निराेगी जीवनशैली कशी असावी, याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, अाहार, विहार, निद्रा यांचे याेग्य प्रमाणात संतुलन साधून तसेच मानसिक ताण अजिबात घेता, याबाबत नियाेजन करायला हवे. अनेकदा अापल्याला असे वाटते की, एखादा पदार्थ खाणे बंद केल्यास त्याचा उपयाेग शरीराला हाेताे, पण तसे नसते. शरीराला नेमका काय त्रास हाेताे? हेदेखील पाहायला हवे. शरीराला प्रत्येक पदार्थाची अावश्यकता असते; फक्त ते किती प्रमाणात अाणि केव्हा खावे? हे अाेळखावे, असा सल्लाही त्यांनी िदला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.रंजना बाेरसे, माधुरी जहागीरदार उपस्थित हाेते. अमाेल जाेशी यांनी सूत्रसंचालन केले.

हे खाणे टाळावे
{ब्राऊन ब्रेड नकाे.
{ मैद्याचे काेणतेही पदार्थ टाळावे.
{ जे खूप चकचकीत दिसते ते हानिकारक असते.

अशी आहे अाहाराची एबीसीडी
पिरॅमिडप्रमाणेअाहार असावा. नैसर्गिक अन्नावर भर द्यावा. निसर्गाने जे-जे दिले अाहे, ते अगाेदर खावे. यात धान्य, डाळी, भाज्या, फळे, तेलबिया, सुकामेवा, दूध, दही यांचा समावेश अधिक असावा. अाहारात भाज्या, फळे दिवसातून चार ते पाच प्रकाराची खावी. साखर, मीठ, मैदा, पाॅलिश केलेले तांदूळ हे सगळे पांढरे शत्रू असून असे अन्न टाळावे. जे अन्न सामान्यपणे पचते ते शरीराला द्या. नाश्ता राजासारखा, दुपारचे जेवण भुकेप्रमाणे, सायंकाळी थाेडे खावे अाणि रात्री अल्पाेपाहार करावा.

तीन दिवस मांसाहार याेग्य
मांसाहार करताना अाठवड्यातून शक्यतो तीन दिवसच करावा. कारण मांसाहारात फायबर नसते. त्यामुळे लवकर पचनक्रिया हाेत नाही. मांसाहार करताना ७० ते ८० ग्रॅम खावे अाणि त्यासाेबतच एखादी भाजी खावी. तसेच मद्यपानही अाठवड्यातून दाेन दिवसच करावे. शक्यताे बॅलेन्स जाईल एवढे मद्यप्राशन करू नये.

प्रत्येक नागरिकाने याला द्यावे प्राधान्य
धान्याततांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा यात कधी पाेळी, कधी भाकरी हे पर्याय अापण निवडू शकताे. डाळी, कडधान्ये, मसाल्यात शाहजिरे, दालचिनी, अाेवा, धणे, तेलबियांमध्ये शंेगदाणे, तीळ (काळे-पांढरे) , दूध (गाईचे), साेयाबीन अाणि तेल, तूप, गुळासह घरी बनवलेले लाेणी खाणे चांगले. ते सात तास झाेप हवीच. जमिनीवर मांडी घालून जेवणाला बसावे, अन्न शिजवताना मन शांत ठेवावे. अन्नाविषयी वाईट शब्द नकाे, अन्नात शक्यताे मधूर, तिखट, अांबट, तुरट यासारख्या सर्व स्वादांचा समावेश करावा. जेवढे अायुष्य दिलेय ते गुणवत्तेने जगावे.

मधुमेहींनी त्रिसूत्री ठेवावी
मधुमेहीनागरिकांनी मानसिक तणाव घेऊ नये. तसेच विहार, अाहर याेग्यप्रमाणात ठेवावा, ही ित्रसूत्री लक्षात ठेवावी. मधुमेह असणाऱ्यांनी दरराेज अर्धातास पायी फिरायलाच हवे. अतिरक्तदाब असल्यास बेकरी पदार्थ, अजि-नाे-माेटाे, साेडा, साॅफ्ट ड्रिंक्स, लाेणचे, पापड अाणि नमकीन कमी खावे.

शरीरात प्रदूषण हाेऊ देऊ नका
शरीरासअर्धेपाेट जेवण, पावपाेट हवा अाणि पावपाेट पाणी लागते. अापण अर्धेपोट कधीच जेवत नाही; उलट एवढे पाेटभर खाताे की, इतर गाेष्टींना जागाच शिल्लक नसते. अादर्श खाणे असल्यास सकाळी उठल्यावर अानंद झाल्यानंतर समजावे की तुमचे शरीर चांगले अाहे. शरीरात प्रदूषण हाेऊ देऊ नका. जाे अावडेल ताे व्यायाम करावा.