जळगाव - आर्यनस्कूलतर्फे जळगाव शहरात डान्स स्पर्धा फॅशन शोचे आयोजन १९ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या शोचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षिका सरोज खान यांची या शोसाठी खास उपस्थिती राहणार आहे. बाल, मध्यम खुला या तीन गटांत या स्पर्धा होणार आहेत.
ग्रुप डान्स, कपल डान्स, सोलो डान्स फॅशनचा यात समावेश असून ते १२ वर्षे- बाल गट, १२ ते १८ वर्षे- मध्यम गट, १८ वर्षांपासून पुढे खुला गट या तीन गटांत या स्पर्धा होतील. प्रत्येक गटासाठी विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम बक्षीस ५१ हजार असून लाख २५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका पासेस जळगाव धुळे येथील "दिव्य मराठी' कार्यालयात आर्यन सुपर कीड्स, भास्कर मार्केट येथे उपलब्ध आहेत. या स्पर्धेसाठी हॉटेल रिंगल पॅलेस हे हॉस्पिलिटी पार्टनर्स आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, उपस्थिती द्यावी, असे आवाहन आर्यन सुपर डान्स धमाकातर्फे डॉ. केदार थेपडे, राजिंदर कोर यांनी केले आहे.
१७, १८ला ऑडिशन
यास्पर्धेसाठी १७ १८ डिसेंबरला ऑडिशन होणार आहे. यात सरोज खान यांचा साहाय्यक मेहल फर्नांडिस यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर फायनल राउंडमध्ये सरोज खान यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात येतील. या कार्यक्रमाचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे मुंबईच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सिंगर यांचा गेस्ट अॅपेरन्स असणार आहे.