आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दांडिया खेळण्यावरून वाद; तीन तरुणांवर चाकूहल्ले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जानकीनगरात दाेन दिवसापूर्वी दांडिया खेळण्यावरून तरुणांमध्ये वाद झाला हाेता. या वादाचा वचपा काढण्यासाठी बुधवारी चार तरुणांनी दाेन तरुणांवर चाकूने सहा वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या दाेघांची प्रकृती चिंताजनक अाहे, तर ईश्वर काॅलनीत मंगळवारी रात्री दांडिया खेळताना तरुणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर चार जणांनी तीन ठिकाणी चाकूने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी बुधवारी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला अाहे.
जानकीनगरातील एका दुर्गा मंडळातील तरुणांशी दांडिया खेळण्यावरून दाेन दिवसांपूर्वी तुकारामवाडीतील राहणाऱ्या काही तरुणांचे वाद हाेऊन जाेरदार हाणामारी झाली हाेती. हा वाद सुरू असताना संदीप मारुती सपकाळे (वय २८) नीलेश दगडू वाघ (वय २०) हे दोघे त्या ठिकाणी उपस्थित होते. तुकारामवाडीतील तरुणांकडे बघून संदीप अाणि नीलेश हसत असल्याच्या संशयावरून काही तरुणांनी दोघांना त्याचा जाब विचारला होता. नीलेश अाणि संदीप हसल्याचा राग मनात ठेवून सुरज (पूर्ण नाव माहीत नाही), गोल्या चौधरी, मयूर चौधरी गणेश बुधवारी सकाळी ५.३० वाजता जानकीनगरात अाले. त्यांनी दुर्गा मंडळाजवळ उभ्या असलेल्या संदीप सपकाळे यावर चाकूने हल्ला केला. त्याच्या पाेटावर उजव्या बाजूला भाेसकले अाहे. त्यानंतर हल्लेखाेरांनी नीलेश वाघच्या घराकडे माेर्चा वळवला. नीलेश हा घरात झाेपलेला हाेता. ते घराचा दरवाजा ताेडून अात घुसले. त्यांनी नीलेशच्या पाठीवर चाकूने सपासप पाच वार केले. एवढ्यावर थांबता त्यांनी नीलेशला घराबाहेर फरपटत अाणले. नीलेशच्या पाठीवरील वारात फुप्फुसाला इजा झाल्याने ताे खाली काेसळला. त्यानंतर हल्लेखाेर विलंब करता घटनास्थळावरून पसार झाले.

नागरिक कुटुंबीयांनी दाखल केले रुग्णालयात

परिसरातीलनागरिकांनी तसेच त्याच्या कुटुंबीयांनी दोघांना उपचारासाठी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यात नीलेशची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. तर संदीपवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. मात्र, त्याचीही प्रकृती चिंताजनकच असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाकूहल्ल्यात जखमी झालेला संदीप सपकाळे.

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने हल्ला
कासमवाडीतील काही टवाळखाेरांनी मंगळवारी रात्री ११.३० वाजता दुर्गा मंडळाजवळ ईश्वर काॅलनीतील एका तरुणीची छेड काढली हाेती. त्याचा जाब विचारण्यासाठी तरुणीचा भाऊ गेला असता त्याला बंटी, साेनल, अाकाश, मनीष (पूर्ण नावे माहीत नाही) यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूहल्ला केल्याचा अाराेप तरुणीच्या भावाने केला. हल्लेखाेरांनी तीन ठिकाणी चाकूने भाेसकल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात अाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...