आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांच्या दहशतीमुळे शहरात फिरणे अवघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातसर्वत्र मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे. तरीदेखील महापालिका प्रशासन हे आपले कामच नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी कोल्हे विद्यालयात कुत्र्यांच्या झुंडीने तीन वर्षांच्या बालकावर हल्ला चढवत त्याचे लचके तोडल्याची घटना घडली. तरीदेखील महापालिका प्रशासन काही हालचाल करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे सध्या शहरवासीय वैतागले आहेत. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाला या समस्येबाबत काही देणेघेणे दिसत नसल्याने सामान्य जनता चांगलीच कोंडीत सापडली आहे. बुधवारी काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयातील सोहम नेमाडे या तीनवर्षीय बालकावर कुत्रे झुंडीने तुटून पडले होते. या वेळी शिक्षिकेने कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता, ते त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच अजिंठा चौफुलीवरदेखील एका बालकावर कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे लचके तोडले. यासह अन्य चार नागरिकांना कुत्र्यांनी चावे घेतल्याने ते सिव्हिल खासगी रुग्णालयांत दाखल झाले होते. तरीदेखील महापालिका प्रशासनाने काहीही उपाययोजना केल्या नाहीत.

लहान बालके बनताहेत लक्ष्य
शाळेतजात असताना किंवा अंगणात खेळत असलेल्या लहान बालकांवर मोकाट कुत्रे हल्ला चढवत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे बालकांना एकटे सोडणे पालकांसाठी अवघड झाले आहे. कुत्र्यांच्या भीतीमुळे मुले अनेकदा शाळेत क्लासला जाणेही टाळत असल्याचे अनेक पालकांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

दिवसाहीभीतीचे वातावरण
शहरातआता कुत्र्यांनी दिवसादेखील उच्छाद मांडला आहे. बाजारातून जात असलेल्या नागरिकांच्या हातातील िपशवीवर ते तुटून पडतात. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिक प्रचंड घाबरतात. परिणामी, दिवसादेखील रस्त्यावर फिरणे मुश्कील झाले आहे.
पालिकेच्या अर्थसंकल्पात कुत्रे निर्बीजीकरणासाठी लाखोंची तरतूद केली असतानाही केवळ खराब आर्थिक परिस्थितीअभावी जनतेच्या जीवाशी खेळले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून निर्बीजीकरण होत नसल्याने शहरात कुत्र्यांची संख्या वाढत असून, या प्रकाराला केवळ पालिकेचे आर्थिक धोरण जबाबदार असल्याचे मानले जात आहे. तसेच प्रशासन याबाबत अजूनही गंभीर नसल्याने कुत्र्यांच्या चाव्याने घायाळ होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.

महापालिकेच्या बजेटमध्ये दरवर्षी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात येते. मात्र, ही तरतूद केवळ नावालाच केली जाते. प्रत्यक्षात नियोजनानुसार त्याचा कधीही वापर केला जात नाही. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. हे सर्वश्रुत असले तरीही नागरिकांच्या जीवाची काळजी घेण्याची जबाबदारीदेखील पालिकेचीच आहे. किरकोळ कामांअभावी गेल्या चार महिन्यांपासून कुत्रे पकडण्याची डॉग व्हॅनही भंगारात काढली आहे.

संस्थेचेपैसेही थकवले : २०१२मध्येऔरंगाबाद येथील एका संस्थेकडे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या वेळी मार्च, एप्रिल मे या तीन महिन्यांत ३,२०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते. त्यामुळे संस्थेचे पालिकेकडे १२ लाख रुपये घेणे असून, त्यापैकी केवळ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. उर्वरित लाख रुपये अदा केले जात नसल्याने या संस्थेने काम करणे बंद केले आहे.
या भागात कुत्र्यांचा वावर
मोकाट कुत्रे सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात असले तरी शहरातील भिलपुरा, कांचननगर, जैनाबाद, जुने जळगाव, पिंप्राळा रोड, बळीरामपेठ, शिवाजीनगर, प्रेमनगर, तांबापुरा, मेहरूण, अयोध्यानगर, रामानंदनगर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर भागात मोकाट कुत्र्यांनी सर्वाधिक उच्छाद मांडला आहे.