आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरग्‍यात चोरी करणारा अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-ख्वाजामियॉँ दरग्‍यात दानपेटीतून 44 हजारांचा ऐवज लंपास करणार्‍या एका चोरट्याला जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाने रविवारी पहाटे 3 वाजता रंगेहाथ पकडले तर त्याचा एक साथीदार मात्र पळून गेला.
जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एन.जी.मोरे, विष्णू वाघ, रवी नरवाडे आणि सुरेश पाटील यांचे पथक रविवारी पहाटे गस्त घालत होते. त्यांना ख्वाजामियॉँ दग्र्याच्या परिसरात शेख जाफर शेख मोहम्मद (वय 39, रा.गेंदालाल मिल) आणि हारुल उर्फ शाहरुख फारुख भिस्ती हे दोघे संशयितरीत्या आढळून आले. जाफरच्या पाठीवर मोठी पोटली असल्याचे पोलिसांच्या निदशर्नास आले. पोलिसांनी त्यांना हटकले. विचारपूस सुरू करण्याआधीच शाहरुख पळून गेला. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी जाफरला ताब्यात घेऊन विचारपूस केली. शाहरुखच्या मदतीने आपण दग्र्याच्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यातून रोकड आणि सोन्याची अंगठी चोरी केल्याची कबुली जाफरने दिली. पोलिसांनी त्याला अटक करून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जाफरकडून 44 हजार 71 रुपयांच्या नोटा आणि एक सोन्याची अंगठी पोलिसांनी हस्तगत केली आहे. सोमवारी जाफरला न्यायाधीश व्ही.एस.पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अँड.हेमंत मेंडकी यांनी काम
पाहिले.बांधकामासाठी ठेवली होती दानपेटी
ख्वाजामियॉँ दग्र्याचा परिसर सुशोभिकरणासाठी गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी भक्त आणि दानशूर यांनी खर्च करावा यासाठी तेथे एक मोठी दानपेटी ठेवण्यात आली होती. ही दानपेटी बर्‍याच दिवसांपासून उघडण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तिच्यात मोठी रोकड जमा झाली होती. ती दानपेटी फोडून चोरट्यांनी पोबारा केला होता; मात्न पोलिसांनी रंगेहाथ पकडले.