आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दसऱ्याला ४५० चारचाकी, ७००, दुचाकी राहणार अंगणात उभ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दसऱ्याला केलीली खरेदी स्मरणात राहावी. तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त कॅच करण्याची संधी कुणीही साेडत नाही. त्यामुळे गेल्या अाठवड्यापासून बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांधी झुंबड उडत अाहे. साेमवारी बाजारपेठा गर्दीने फुल्ल हाेत्या. वाहन बाजार टाॅप गिअर टाकून सुसाट धावत हाेता. अनेक नागरिकांनी दसऱ्यांच्या पूर्वसंध्येला वाहनाचे बुकींग केले.
दसऱ्याला ४५०...
४५०चारचाकी तर ७०० दुचाकी नागरिकांच्या घरा पुढे उभ्या राहणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलतांना दिली. दसऱ्यानिमित्ताने गेल्या आठवड्यांपासून वाहन, सोने, कपडे, घरे सर्वच व्यवसायांमध्ये तेजी दिसून येत आहे. शहरातील चारचाकींच्या शोरूममध्ये ६०० चारचाकींचे बुकिंग झाले असून त्यापैकी ४५० चारचाकी दसऱ्याच्या दिवशीच ग्राहकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. तर उर्वरित चारचाकींसाठी वेटिंग सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या चारचाकींची डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न शोरूम चालकांचा राहणार आहेत. तर अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तासाठी दसऱ्यालाच बुकिंग करून ठेवले आहे. याचबरोबर दुचाकी बाजाराला चांगलीच गती मिळाली आहे.

शहरातील दुचाकींच्या सर्वच शोरूममधून सुमारे ७०० दुचाकींचा ताबा मंगळवारी ग्राहक घेतील. दुचाकीमध्येही काही ठरावीक ब्रँडच्या दुचाकींची वेटिंग आहे. त्याशिवाय इतर सर्वच दुचाकी मंगळवारीच ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...