आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दसऱ्याच्या खरेदीसाठी धावपळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा उत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले असून सोने कपडा बाजारात तेजी निर्माण झाली अाहे. चार दिवसापासून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत अाहे. रविवारी फुले मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली हाेती.
रविवारी सुटीचा दिवस असतानाही व्यापाऱ्यांनी सराफ बाजार सुरू ठेवला होता. ऑक्टोबर महिन्यातच दसरा दिवाळी असल्यामुळे एकाच वेळी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. पाऊस चांगला झालेला असल्यामुळे यंदा लग्नसराईदेखील धामधुमीत होणार अाहे. सोन्याचे भाव किरकोळ प्रमाणात कमी-जास्त होत असले तरी ग्राहकांचे मत परिवर्तन होत नसून उलट खरेदीकडे लोकांचा कल वाढला असल्याचे मत अजय ललवाणी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

झेंडूची फुले महागली : चारदिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला फेकली जात असलेली झेंडूची फुले आता सणाच्या तोंडावर महागली आहेत. सतत सुरू असलेल्या पावसामुळे उत्पादकांची संख्या वाढल्याने यंदा झेंडूच्या फुलांना भाव मिळाला नाही. परिणामी ही फुले रुपयांपेक्षाही कमी भावाने शनिवारपर्यंत विकली गेली. मात्र, सणाचा उत्साह वाढताच विक्रेत्यांनी या फुलांचा भाव अनेक पटीने वाढवला आहे. रविवारी किरकोळ विक्रेत्यांकडे झेंडूंच्या फुलांचा भाव ४० रुपये किलो असा होता. सोमवारी दसऱ्याच्या दिवशी हा भाव शंभरावर विकला जाऊ शकतो, असेही विक्रेत्यांनी सांगितले.

दांडिया ज्वर चढला
सुटीच्यादिवसाचे औचित्य साधून नोकर वर्गाने रविवारी दांडिया, गरबा यांचा कुटुंबासह आनंद लुटला. शहरातील खान्देश सेंट्रल, १७ मजली इमारतीसह उपनगरांमध्ये स्वतंत्रपणे दांडिया, गरबा रास सुरू आहेत. कॉलन्यांमधील गरबा, दांडियाला देखील रविवारी चांगलीच गर्दी झाली होती. गरबा, दांडिया पाहण्यासाठी देखील हजारो नागरिकांची रस्त्यावर गर्दी उसळली होती.

कापड बाजार फुलला
दसऱ्या निमित्त नवीन कपडे खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. रविवारी सुटीचा दिवस असतानादेखील कपडे खरेदीसाठी प्रमुख ठिकाण असलेले फुले मार्केट सुरू होते. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच ग्राहकांची फुले मार्केटमध्ये गर्दी झाली होती. तर दसरा कॅश करण्यासाठी विविध नामांकित कंपन्यांनीही ऑफर्स सुरू केल्या आहेत. तसेच शहरात ठिकठिकाणी सेल सुरू झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...