आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सरल डाटाबेस प्रणाली’ने केली शिक्षकांची गोची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शालेयशिक्षण क्रीडा विभागाच्या आदेशानुसार ‘सरल डाटाबेस’ शाळा, विद्यार्थी शिक्षकांची माहिती ऑलाइन गोळा करण्यात येत आहे. ही माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये भरावी लागणार असून त्याची जबाबदारी शिक्षण विभागाने शाळेवर अन‌् शाळेने वर्ग शिक्षकांवर सोपवली आहे. त्यामुळे शिक्षकांचा वर्गावर शिकवण्यापेक्षा माहिती गोळा करण्यातच वेळ वाया जात आहे. ऑनलाइन माहिती भरताना सर्व्हर डाऊन असणे, इंटरनेट कनेक्ट हहोत नसल्यानेदेखील ममोठी समस्या निर्माण होत असून ‘सरल’ने एक प्रकारे शिक्षकांची मोठी गोची केली आहे.

राज्य शासनाने जुलैला निर्णय देऊन राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी, शिक्षक या सर्वांची माहिती संकलित करण्यासाठी सरल डाटाबेस या संगणक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व माहिती एकत्रित करण्यात आल्यानंतर भविष्यात विविध योजना राबवणे, आर्थिक तरतूद करणे, या इतर गोष्टींकरिता त्याचा लाभ होणार आहे. त्यानुसार संगणकावर ऑलाइन माहिती भरण्याबाबत गेल्या महिन्यात जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक एक प्रतिनिधीला प्रशिक्षण देण्यात आले. सध्या सर्वच शाळांमध्ये सरल डाटाबेस प्रणालीसाठीची माहिती गोळा करण्याची ऑनलाइन भरण्याची लगीन घाई सुरू आहे. ही माहिती गोळा करताना मुख्याध्यापक शिक्षकांची चांगलीच कसरत होत आहे.

गुणपत्रकही ऑनलाइन
प्रणालीमुळे ऑनलाइन गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखलाही देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर त्याचा दाखल ऑनलाइन ट्रान्सफर करता येणार आहे.

शिक्षकांना कामाला जुंपले
सरलसाठीमाहिती गाेळा करण्याची जबाबदारी वर्ग शिक्षकांवर आहे. त्यामुळे सध्या शिक्षक कामात व्यस्त आहेत. त्यामुळे त्याचे शिकवण्यावर दुर्लक्ष होत आहे. वास्तविक प्रत्येक शाळेत नाेंदणी रजिस्टरला विद्यार्थ्यांची परिपूर्ण माहिती आहे. त्या आधारावर शाळेचे िलपिक मुख्याध्यापक ही माहिती भरू शकतात. तरीदेखील शिक्षकांच्या हाती अर्ज देऊन विद्यार्थ्यांकडून माहिती मागवण्यात येत आहे.

ग्रामीण भागात आजही अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड, रक्तगट आणि बंॅक खाते नाही. त्यामुळे शिक्षकांना ती माहिती मिळत नसून त्या विद्यार्थ्यांचा अर्ज अपूर्ण पडून आहे. शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी गेल्या आठवड्यात रक्तगट आधार कार्ड सक्ती नसल्याचे सांगितले. पण ऑनलाइन अर्जात हे दोन्ही रकाने असून त्यात माहिती भरल्याशिवाय अर्ज दाखल होत नाही.
शाळांनाएकूण८० प्रकारची माहिती एकाच अर्जात भरण्यास सांगितले होते. मात्र, नियोजित वेळेत ही माहिती भरणे शक्य नव्हते. त्यामुळे पहिल्या १५ प्रकारची माहिती भरण्यास सांगण्यात आले आहे.
१९९५पूर्वीचीजन्मतारीख असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती भरताना शिक्षकांना अडचणी येत आहेत. या प्रणालीत असलेल्या त्रुटींमुळे देखील अडचणी येत आहेत.
अनेकशाळांमध्येसंगणक इंटरनेटची व्यवस्था नाही. त्यामुळे शाळांची गाेची झाली आहे. तर ज्यांच्याकडे संगणक इंटरनेटची व्यवस्था आहे तेथे सर्व्हर डाऊन, इंटरनेट कनेक्ट होत नसल्याने अडचणी वाढत आहे.

प्रणालीवरमाहितीशाळेतच भरण्याचे शिक्षकांना बंधन घातले आहे. पण नियोजित वेळेत ही माहिती भरली जात नसल्याने शिक्षकांचा अधिक वेळ खर्ची होत आहे.

डोकेदुखी
‘सरल डाटाबेस’ प्रणालीमुळे शाळांना वारंवार माहिती भरावी लागणार आहे. कुणालाही ही माहिती बघता येणार असून कामे सोपे होतील. तेजरावगाडेकर, शिक्षणाधिकारी
बातम्या आणखी आहेत...