जळगाव- पंतप्रधाननरेंद्र माेदी यांचे तीन ड्रीम प्राेजेक्टपैकी एक असलेल्या ‘बेटी बचाअाे, बेटी पढाओ’ या अभियानाचा देशासाठी भाजपने मास्टर प्लॅन तयार केला अाहे. ही याेजना राज्य, जिल्हा अाणि ग्रामीण भागापर्यंत पाेहोचवण्यासाठी लवकरच विशेष टीम तयार करण्यात येणार अाहे. ही टीम मुलींचा जन्मदर कमी असलेल्या ठिकाणी काम करणार अाहे. यासाठी देशातील १०० िजल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले असून यात जळगाव िजल्ह्याचादेखील समावेश करण्यात अाला अाहे, अशी माहिती भाजपच्या ‘बेटी बचाअाे, बेटी पढाअाे’अभियानाचे राष्ट्रीय संयाेजक डाॅ.राजेंद्र फडके यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना िदली.
भारतीय जनता पक्षातर्फे ‘बेटी बचाअाे, बेटी पढाअाे’ या अभियानासाठी राष्ट्रीय समिती गठीत करण्यात अाली अाहे. यात देशभरातील अामदार, खासदार, ज्येष्ठ नेते यांचा सहभाग अाहे. या समितीच्या राष्ट्रीय संयाेजकपदी डाॅ.राजेंद्र फडके यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अागामी कार्याविषयी माहिती जाणून घेतली. ते म्हणाले की, अभियानात अाम्ही प्रबाेधनावर अधिक भर देणार अाहाेत. त्यासाेबत अवैध गर्भलिंग तपासणी केंद्रांवर अाळा घालण्यात येणार अाहे. तसेच धार्मिक प्रवचन, कीर्तन, कथा याद्वारे प्रबाेधन हाेण्यासाठी संत, कथाकार, प्रवचनकार यांना अभियानात सहभागी करून घेण्यात येणार अाहे. यासंदर्भात देशभरातील १८ राज्यांत तर सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात बैठका घेण्यात अाल्या अाहेत.
खेळाडू, कलावंत हाेणार ब्रँड अॅम्बेसेडर
जनजागृतीकरण्यासाठी खेळाडू कलावंतांना ब्रँड अॅम्बेसेडर करण्यात येणार अाहे. तसेच प्रत्येक भागातील सामाजिक परंपरा, संस्कृतीचा अभ्यास करून त्या माध्यमातून प्रबाेधन करण्याचे नियाेजन सुरू अाहे. यात बालक संमेलन, माता-पिता संमेलन, वधू-वर मेळावा, महाविद्यालयांतील युवक-युवतींना जाऊन सांगणे, संदेशपर रथ गावागावांत फिरवणे, साेशल मीडिया, टीव्ही, जाहिराती, पाेस्टर्सद्वारेही प्रबाेधन करण्यात येईल.
१०० जिल्ह्यांत अगाेदर काम
१०००मुलांच्या पाठीमागे ९२९ मुली असा जन्मदर असलेल्या देशभरातील १०० जिल्ह्यांमध्ये अगाेदर काम केले जाणार अाहे. यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश अाहे. या कार्यासाठी शासकीय याेजनांचा समावेश करण्यात येणार अाहे. अभियानात शाळकरी मुलींची जास्तीत जास्त नाेंदणी कशी वाढवता येईल ती टिकवण्यावरही लक्ष देण्यात येणार अाहे.
गणेशाेत्सव,नवरात्रीत जनजागृती
गणेशाेत्सवनवरात्रीत मंडळांनी ‘बेटी बचाअाे, बेटी पढाअाे’चे देखावे सादर करावे. तसेच कुमारीकांचे पूजन करावे, या विषयावर निबंध, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद, नाटिका, लघुनाटिका घेण्यात येणार अाहे. त्यासाठी मंडळांना अावाहनही करण्यात येणार अाहे.