आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडीप्रकरणी दौलताबादचा आरोपी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भरदिवसा घरफोडी करणार्‍या टोळीतील दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवरी अटक केली. या दोघांनी भुसावळ तसेच मुक्ताईनगर तालुक्यात महिनाभरात 8 घरफोड्या केल्याची कबुली दिली. या चोरट्यांनी इतर जिल्ह्यांमध्ये 14 घरफोड्या केल्या आहेत.

जळगाव जिल्ह्योतील घरफोड्यांचा तपास करीत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिनाभरापासून एका विशेष पथक चोरट्यांच्या शोधात होते. दौलताबाद (जि. औरंगाबाद) येथून शेख लियाकत शेख बाबूलाल (24) आणि चिखली तालुक्यातील मेरा बु. येथून किशोर तेजराव वायाळ (32) यांना एलसीबीच्या पथकाने मुक्ताईनगरहून अटक केली आहे.

रिक्षाचालकाचे झाले घरफोडे
दोघे सुरत येथे रिक्षाचालक होते. त्यानंतर व्यवसाय सोडून ते गावी परतले होते. दरम्यान गेल्या वर्षी वायाळ याच्या नातेवाइकाला औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर योगायोगाने या दोघांची भेट झाली. याच ठिकाणी त्यांनी घरफोड्याचा कट रचला. दोघेही वायाळ याच्या गावी गेले तेथून त्यांचा घरफोडीचा प्रवास सुरू झाला.

जालना, विदर्भातही कारनामे
मुक्ताईनगरात 3, भुसावळ, पहूर आणि पहूर पाळधी येथे प्रत्येकी 1 अशा जळगाव जिल्ह्यात 6 घरफोड्या केल्याची कबुली दोघांनी दिली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील दुई येथील दीपक फेगडे यांच्या घराचे कुलूप तोडून 2 लाख 40 हजार रुपयांची घरफोडी केल्याच्या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. जालना, अंबड, अकोला, खामगाव, चिखली, बुलडाणा येथेही त्यांनी 14 घरफोड्या केल्या. या प्रकरणात त्यांना अटक होऊन 15 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.