आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकमध्ये सापडला तरुणाचा मृतदेह; ट्रकमधील सिमेंट गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पिंप्राळा शिवारात इंद्रनील सोसायटीजवळ असलेल्या कब्रस्तानशेजारी बुधवारी रात्री १.४० वाजेच्या सुमारास ट्रक बेवारस उभा होता. पोलिसांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्यात एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.
२९ डिसेंबरला हा ट्रक लाख २० हजारांच्या सिमेंटसह गायब झाल्याची तक्रार मालकाने नशिराबाद पोलिस ठाण्यात दिली होती.

चार दिवसांपूर्वी चोरीचा गुन्हा
सहा दिवसांपूर्वी नशिराबाद येथील शेख रज्जाक शेख करीम यांचा ट्रक (क्रमांक एमएच-१९-झेड-१८५६) २६ डिसेंबरला लाख २० हजार रुपये किमतीच्या ३५० सिमेंटच्या गोण्या घेऊन निघाला होता. तीन दिवस ट्रकचा पत्ता लागल्याने शेवटी शेख रज्जाक यांनी २९ डिसेंबरला नशिराबाद पोलिसात ट्रकचालक बशीर खान शाबास खान याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी ट्रकचा तपास सुरूच ठेवला.
बुधवारी रात्री तो ट्रक पिंप्राळा शिवारातील इंद्रनील सोसायटीजवळ असलेल्या कब्रस्तानजवळ बेवारस उभा होता. नागरिकांनी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना कळवल्यानंतर बुधवारी रात्री १.४० वाजेच्या सुमारास घटनास्थळावर जाऊन ट्रकची तपासणी केली. त्यात चालक बशीर खान शाबास खान (वय ३८) याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मानेवर गंभीर जखमा आहेत. सिमेंट चोरून कोणीतरी चालकाचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ट्रकमालक शेख रज्जाक यांनी फिर्याद दिल्यानंतर रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.