जळगाव- समतानगरात वृद्धाचे रविवारी दुपारी १२ वाजता निधन झाले. त्यांना कोणीही वारस नसल्याने नागरिकांनी नगरसेवकांना फोन करून अंत्ययात्रेचे वाहन मागितले. परंतु ते पाठवल्याने संतप्त नागरिकांनी सायंकाळी ते रात्री ८.३० वाजेपर्यंत मृतदेह नगरसेवकांच्या घरासमोर हातगाडीवर आणून ठेवला. त्यामुळे दीड तास तणावाचे वातावरण होते.
मधुकर सोनवणे (वय ८०) यांचे रविवारी निधन झाले. त्यांना अपत्य नसल्याने नागरिकांनी त्यांची अंत्ययात्रा काढण्याचे ठरवले. त्यासाठी नगरसेवक नितीन बरडे सविता शिरसाठ यांना फोन करून अंत्ययात्रेचे वाहन पाठवण्यास सांगितले. मात्र, सायंकाळपर्यंत वाहन आले नाही. त्यामुळे नागरिकांनी सायंकाळी वाजता मृतदेह नगरसेवक बरडे यांच्या घरासमोर हातगाडीवर टाकून आणला. तसेच महाबळ कॉलनी चौकात गोंधळ घालून रास्ता रोकोही केला. किरकोळ दगडफेकीमुळे दुकानदारांनी दुकाने बंद केली. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास बरडे यांचे कार्यकर्ते अनिस पठाण यांनी अंत्ययात्रेचे वाहन आणल्याने तणाव निवळला.
कुणीही फोन केला नाही
- अंत्ययात्रेच्या वाहनासाठी मला कुणीही फोन केला नाही. मात्र, याबाबत कळल्यानंतर तत्काळ व्यवस्था केली.
नितीन बरडे, नगरसेवक
वाहन आल्याने गोंधळ
- संबंधितांना वाहन घेण्यासाठी तीन ठिकाणी पाठवले होते. मात्र, ते उपलब्ध झाल्यानेच हा गोंधळ झाला.
सविता शिरसाठ, नगरसेविका