आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॉट‌्सअॅपमुळे पटली मृत तरुणीची ओळख, श्रीहरी काॅलनीतील पूनमसाठी सुरू होते वरसंशोधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरापासून जवळ असलेल्या नकाणे तलावात सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. पोलिसांनी व्हॉट‌्सअॅपवर मृत मुलीचा फोटो अपलोड केल्यामुळे काही तासातच हा मृतदेह पूनम बाविस्कर हिचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी डीएड झालेल्या पूनमसाठी वर संशोधन सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नकाणे तलावात काल मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर वॉचमन हिलाल सोनवणे यांनी धुळे तालुका पोलिसांना कळविण्यात आले; परंतु तिची ओळख पटविणारा कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मृत तरुणीचा फोटो पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर टाकला. शिवाय माहितीसाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

काही वेळातच हा फोटो वेगवेगळ्या ग्रुपमध्ये व्हायरल झाला. सायंकाळी हा फोटो एका ग्रुपमार्फत तरुणीच्या मामाने पाहिला. त्यामुळे हा मृतदेह पूनम हिंमतराव बाविस्कर (२१, रा. श्रीहरी कॉलनी, धुळे) हिचा असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय तिचे मामा इतर नातलगांनी धुळे तालुका पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर बुधवारी सकाळी शवागारमध्ये पूनमचे वडील मामा यांनी मृतदेहाची ओळख पटवली. शवविच्छेदन शासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर पूनमचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, या घटनेप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक नंदा पाटील या घटनेचा तपास करीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

काय घडले मंगळवारी
श्रीहरीकॉलनीतील रहिवासी असलेली डीएड झालेली पूनम हुशार होती. सध्या ती नाेकरीच्या शोधात होती. सायबर कॅफेवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरून येते असे सांगून ती घराबाहेर पडली होती; परंतु त्यानंतर मात्र ती परत आली नाही. त्यामुळे तिचा शोध सुरू झाला. ती हरविल्याबाबत पोलिसांत नोंद करण्यासाठी जात असताना व्हॉट‌्सअॅपवरील फोटो त्यांच्यापर्यंत जाऊन पोहाेचला. दरम्यान, भावंडांमध्ये पूनम ही मोठी होती. तिला एक भाऊ बहीण आहे. पूनमचे वडील शिरपूर एसटी आगारात कार्यरत आहेत.

सर्व बाजूंनी तपास
व्हाॅट‌्सअॅपमुळे काही तासात पूनमची ओळख पटली. तिच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. शिवाय तिच्या निकटवर्तीयांंकडे याबाबत चौकशी केली जाईल. -नंदापाटील, पोलिस उपनिरीक्षक
बातम्या आणखी आहेत...