आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फीच्या नादात बुडालेल्या मच्छिंद्रचा आढळला मृतदेह, सहा तास शोधमोहिमेनंतर पोलिसांना यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- लळिंगकुरणातील लांडाेर बंगला परिसरात अायाेजित भीमस्मृती यात्रेसाठी अालेला युवक काल रविवारी बेपत्ता झाला हाेता. त्याचा मृतदेह सहा तासांच्या शाेधमाेहिमेनंतर पाण्यातून बाहेर काढण्यात अाला. सेल्फी काढताना खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पाेलिसांकडून व्यक्त केला जात अाहे. त्याच्या डाेक्याला पाठीमागे झालेल्या माेठ्या जखमेवरून हा अंदाज व्यक्त केला जात अाहे.

शहादा येथील मच्छिंद्र नाना इंदवे हा युवक रविवार दुपारपासून लळिंग कुरणात बेपत्ता झाला हाेता. यात्रा संपल्यानंतरही त्याचा कुठेही तपास लागल्याने त्याच्याबराेबर अालेल्या िमत्रांनी त्याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर त्यांनी पाेलिसांना कळविले. त्यानंतर रात्री वाजेपर्यंत स्थानिक पाेहणाऱ्यांच्या मदतीने लळिंग कुरणातील धबधब्याच्या पाण्यात त्याचा शाेध घेण्यात अाला. मात्र, रात्र झाल्याने शाेधमाेहीम थांबवण्यात अाली. सकाळी वाजेपासून पुन्हा लळिंग येथील तरुणाच्या मदतीने पाण्यात शाेधमाेहीम घेण्यात अाली.

सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश अाले. त्यांच्या डाेक्याला पाठीमागे माेठी जखम झाली अाहे. धबधब्यावरून पडल्यानंतर डाेक्याला दगड लागून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात अाहे. सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात ताे खाली पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात अाहे.
त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन िजल्हा रुग्णालयात करून दुपारी मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात अाला. यासंदर्भात माेहाडी पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. दरम्यान, दीड महिन्यातील या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना अाहे.

डोहाचा अंदाज येणे कठीण...
उन्हाळ्यात कोरडा पडलेल्या लळिंग धबधब्याच्या डोहाचा पावसाळ्यात मात्र अंदाज येत नाही. गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी धबधबा काेरडा होता. त्यामुळे डोहातही फारसे पाणी नव्हते; परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने डोह सध्या भरलेला आहे. त्यामुळे या धबधबा अथवा डोहाशेजारी सेल्फी काढताना सावधानता बाळगायला हवी. यापूर्वी अशी घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली. मात्र त्यापासून बोध घेतला जात नाही. बऱ्याचदा तरुण पोहण्यासाठी डोहात उतरतात आिण जीव गमवतात, असे दिसून येते. वन विभागाच्या सूचनांकडेही दुर्लक्ष केले जाते.
बातम्या आणखी आहेत...