आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेहरूण तलावात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह, पाेहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह काढला बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण तलावाच्या किनाऱ्यावर २५ ते ३० वयाेगटातील तरुणाचा मृतदेह गुरुवारी दुपारी वाजेच्या सुमारास तरंगताना अाढळला. एमअायडीसी पाेलिसांनी पाेहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. तलावाच्या बाजूलाच एका खडकाजवळ शर्ट, जिन्स पॅण्ट रबरी चपला पोलिसांना आढळून आल्या. मात्र, मृतदेहाची अाेळख पटली नाही.

मेहरूण तलावाच्या किनाऱ्यावर गुराख्यांना तरुणाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. त्यांनी एमअायडीसी पाेलिसांना कळवल्यानंतर सहाय्यक पाेलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रवींद्र हटकर याने तलावातून मृतदेह बाहेर काढला. मृत तरुणाच्या हाताला राखी बांधलेली हाेती. त्यामुळे बुधवारी सायंकाळची घटना असल्याचा पाेलिसांचा अंदाज अाहे. त्यानंतर मृताला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.

दुर्घटना,आत्महत्या की घातपात?
मृतदेहाचीअाेळख पटलेली नव्हती. त्यामुळे अनेक संशय व्यक्त हाेत अाहेत. मृतदेह ज्या ठिकाणी तरंगत हाेता, त्याठिकाणी पाेहण्यासाठी काेणीही जात नाही. मात्र, मृतदेह वाहत येऊन त्या ठिकाणी तरंगत असल्याची शक्यता अाहे. तर अात्महत्येचाही प्रकार असल्याची शंका अाहे. त्याचे कपडे मृतदेहापासून काही अंतरावर पडलेे हाेते. त्यामुळे घात करून पाण्यात फेकून देऊन अात्महत्या किंवा दुर्घटना भासवण्याच्या प्रकाराची शक्यताही नाकारता येत नसल्याचे पाेलिसांनी सांगितले. गेल्या दाेन दिवसांत जिल्ह्यातील पाेलिस ठाण्यांमध्ये दाखल बेपत्ता तरुणांबाबत शाेध घेत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...