आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात अपघातात पाेलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील सहायक पाेलिस उपनिरीक्षक रघुनाथ कळसकर यांच्या दुचाकीस अजिंठा चौफुलीवर ट्रकने जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. बुधवारी रात्री १०.२९ वाजता हा अपघात झाला. 


सहायक पाेलिस उपनिरीक्षक रघुनाथ सखाराम कळसकर (वय ५५, रा.भुसावळ) हे बुधवारी जळगावात मुलाकडे आले होते. काम आटोपल्यानंतर दुचाकीने (एमएच-१९ बीझेड १९६१) जळगावहून पुन्हा भुसावळला परतत असताना अजिंठा चौफुलीवर त्यांच्या दुचाकीस ट्रकने (डब्ल्यूबी २३ बी ८७७९) जोरदार धडक दिली. यात ते दुचाकीसह पूर्णपणे ट्रकखाली सापडले. ट्रकच्या चाकाखाली कळसकर यांचा मृतदेह असल्यामुळे नंतर नागरिकांनी चालकास पुन्हा ट्रक सुरू करून मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर कळसकर यांचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला. 


कळसकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, दोन मुली नातवंड असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघातानंतर जमावाने ट्रकचालकास चोप दिला. 


मुलगाही पोलिस 
कळसकरयांचा मुलगा हेमंत हा एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात आहेत. घटनेची माहिती कळताच कळसकर कुटुंबीय रुग्णालयात पोहचले होते. डीवायएसपी सचिन सांगळे, सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, पोलिस उपनिरीक्षक रोहन खंडागळे यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखील रुग्णालयात दाखल झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...