आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहलीला गेलेल्या तरूणाचा धरणात पाेहताना तरुणाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील विविध भागात राहणारे सहा मित्र रविवारी दुपारी वाजता निसर्गाच्या सानिध्यात फोटोसेशन करण्यासाठी नशिराबादजवळ असलेल्या मुर्दापूर धरण येथे गेले होते. दरम्यान, पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरल्यानंतर गाळात अडकून मृत्यू झाला. शेख अक्रम शेख नियाज (वय १७, रा.गेंदालाल मिल) असे त्याचे नाव आहे. 

मुदस्सर शेख गनी (वय १८, रा.भिलपुरा), शरीफ शेख इद्रिस (वय १७, रा.उस्मानिया पार्क), नवाज शेख अलाउद्दीन (वय १६), उदनान (रा. इस्लामपुरा), उमेर खान फिरोज खान (वय १८, रा.भिलपुरा) यांच्यासोबत अक्रम हा मुर्दापूर धरणावर गेला होता. त्या ठिकाणी फोटोसेशन करण्यासाठी त्यांनी अतिरिक्त कपडे, कॅमेरादेखील नेला होता. अशी माहिती सोबत असलेल्या एका मित्राने दिली. हे सर्व मित्र रिक्षाने नशिराबाद येथे पोहोचले. तेथून पायीच चालत ते धरणावर गेले होते. अक्रम हा पाण्यात पोहण्यासाठी गेला असता त्याचा तोल गेला. गाळात अडकल्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला. अक्रम पाण्यात बुडत असतानाच सोबत असलेल्या मित्रांनी आरडा-ओरड केली. परंतु धरणावर कोणीच नसल्यामुळे बचाव करण्यासाठी कोणीच आले नाही. त्यांनी जळगाव शहरातील पप्पू खाटीक सय्यद आसिफ यांना फोन करून माहिती दिली. या दोघांनी नशिराबाद येथील ओळखीच्या लोकांना फोन करून मदत करण्यासाठी पाठवले. तत्पूर्वी अक्रमचा मृत्यू झाला होता. रात्री ७.३० वाजता त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला होता. या वेळी गर्दी झाली होती. नशिराबाद, शहर, जिल्हापेठ पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी मदत केली. 

मदतकार्यासाठी लोकांचा पुढाकार 
धरणात युवक बुडाल्याची बातमी नशिराबाद गावात पोहोचताच शेकडो गावकरी धरणाकडे निघाले. सुमारे २० ते २५ पोहणाऱ्यांनी पाण्यात उड्या घेत अक्रमला १० मिनिटात बाहेर काढले. त्याला वाचवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले. परंतु बुडाल्यानंतर त्याचा लगेच मृत्यू झाला होता. 

मुस्कान कोल्ड्रिंक ओळख 
‘मुस्कान कोल्ड्रिंकवाले’ नावाने शेख कुटुंबीयांची ओळख आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये मुस्कान कोल्ड्रिंक नावाने त्यांच्या बर्फगोला विक्रीच्या हातगाड्या आहेत. अक्रम देखील आठवडाभर मदत करीत असे. सहल तसेच फोटोसेशनची आवड असल्यामुळे रविवार सुटीनिमित्त तो नशिराबाद येथे गेला होता. त्याच्या पश्चात आई-वडील पाच भावंडे असा परिवार आहे. 
बातम्या आणखी आहेत...