आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: शाॅक लागून प्रशिक्षणार्थी डाॅक्टरचा मृत्यू; डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव: डाॅ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात रविवारी रात्री इंटर्नशिप करणाऱ्या डाॅक्टर डाॅ.प्रशांत राठाेडचा यांचा विजेचा धक्क्यामुळे मृत्यू झाला. तारेवर कपडे वाळत घालतांना त्यांना विजेचा धक्का बसला. याप्रकरणी मृत डाॅक्टरच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाविद्यालयाचे चेअरमन, रजिस्ट्रार अाणि डीन यांच्या विराेधात सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील डाॅ. प्रशांत संजय राठाेड (वय २७) याने डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर तीन महिन्यांपासून ते याच महाविद्यालयात इंटर्नशिप करीत हाेता. रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास डाॅ. प्रशांत याचा भाऊ श्रीकांत याला महाविद्यालयाचे रजिस्टर झाल्याचे सांगितले. त्यानंतर डाॅ. प्रशांतचे वडील संजय ताेळाराम राठाेड (वय ४७), श्रीकांत अाणि त्यांचे नातेवाईक साेमवारी सकाळी महाविद्यालयात पाेहाेचले. त्या वेळी त्यांना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास डाॅ. प्रशांत हा त्याच्या खाेलीत तारेवर कपडे वाळत घालत हाेता. त्या वेळी त्यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. 
 
गेल्यावर्षीच हाेती तक्रार 
महाविद्यालयातील वसतिगृहाची इलेक्ट्रिक वायरिंग खराब झाल्याची तक्रार डाॅ. प्रशांत याने गेल्या वर्षीच केली हाेती. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने त्याची काेणतीच दखल घेतली नाही. महाविद्यालय प्रशासनाने वेळीच त्याची दखल घेतली असती तर डाॅ. प्रशांत याचा मृत्यू झाला नसता, असा अाराेप त्याचे वडील संजय राठाेड यांनी या वेळी केला.
 
महाविरतरणचे कर्मचारी सायंकाळपर्यंत अाले नाही 

नशिराबाद पाेलिस ठाण्यातर्फे महावितरण कंपनीला साेमवारी सकाळी वाजेच्या सुमारास कुलरची तपासणी करण्यासाठी पत्र पाठविले. सायंकाळी वाजेपर्यंत महावितरण कंपनीचा एकही कर्मचारी घटनास्थळावर तपासणी करण्यासाठी अालेला नव्हता. घटना घडली त्या खाेलीला सील करून एक पाेलिस कर्मचारी दिवसभर बसलेला हाेता. 
 
प्रशासानाची चूक नाही : ही दुर्देवी दुर्घटना अाहे. या प्रकरणात महाविद्यालय प्रशासानाची काेणतीही चूक नाही. वसतीगृहातील किंवा महाविद्यालयातील एखादी वस्तू खराब झाली असेल. तर त्याची माहिती देणे, हे विद्यार्थ्यांचे काम अाहे. मात्र विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात. -डाॅ. एन.एस. अार्वीकर, डीन,डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय 
 
चेअरमन, रजिस्ट्रार, डीनच्या विराेधात गुन्हा 
डाॅ.प्रशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे वडील संजय राठाेड यांनी नशिराबाद पाेलिस ठाण्यात साेमवारी तक्रार दिली. त्यावरून महाविद्यालयाचे चेअरमन, रजिस्ट्रार अाणि डीन हे डाॅ. प्रशांतच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे सांगून त्यांच्यावर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...