आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरम दुधाच्या पातेल्यात पडल्याने अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, धुळे येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- खेळतानागरम दुधाच्या पातेल्यात पडल्याने अडीच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना वाघाडी प्र.डांगरी येथे घडली. अडीच वर्षे वयाची भूमिका जगदीश पाटील खेळत असताना ती घरातील गरम दुधाच्या पातेल्यात पडली. ही घटना गेल्या शनिवारी (दि. १२) राेजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. त्यात ती ४० टक्के भाजली. तिला उपचारासाठी हिरे मेडिकल काॅलेजमध्ये दाखल करण्यात अाले. तेथे उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. 

डाॅ. याेगेश वाणी यांनी तपासणी करून तिला मृत घाेषित केले. याबाबत जगदीश सीताराम पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून साेनगीर पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...