आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाेन वर्षापूर्वी ज्या विहिरीत पती बुडाला, तिथेच पत्नी व अाठ वर्षीय मुलाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाैरेश पाटील, अाशाबाई पाटील - Divya Marathi
गाैरेश पाटील, अाशाबाई पाटील

चाळीसगाव- दोन वर्षापूर्वी ज्या विहिरीत पडून पतीचा मृत्यू झाला होता. त्याच विहिरीत पडून पत्नी व मुलाचा बुडून मृत्यू झाला. चाळीसगाव तालुक्यातील अाडगाव येथे मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली. आशाबाई राजेंद्र पाटील (वय ४०) व मुलगा गौरेश राजेंद्र पाटील (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. 

 
आशाबाई व तिचा मुलगा गौरेश पाटील हे दोघेही दुपारी मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आडगाव शिवारातील उंबरखेड रस्त्यालगतच्या शेतात गेले होते.  गौरेश झाडावरुन बोर काढण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडला. त्याला वाचविण्यासाठी आशाबाई यांनीही विहिरीत उडी घेतली. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. आशाबाईच्या पश्चात सातवीत शिकणारी मुलगी व सासरे असा परिवार आहे.  मृत गौरेश हा पहिलीच्या वर्गात शिकत होता. 

बातम्या आणखी आहेत...