आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडी मारणा-या महाविद्यालयांना दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात २०८ महािवद्यालये असून, त्यातील केवळ १०८ महािवद्यालयांनी ‘युवारंग’ महोत्सवात सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे महोत्सवाला दांडी मारणाऱ्या महािवद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी मािहती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाच्या सल्लागार समितीचे उपाध्यक्ष तथा युवारंग व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी दिली.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग येथील जीटीपी महािवद्यालयातर्फे शनिवारपासून ‘युवारंग’ महोत्सव घेण्यात येत आहे. महोत्सवाच्या तयारीची मािहती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विष्णू भंगाळे यांनी सांिगतले की, जीटीपी महाविद्यालयात प्रथमच विद्यापीठस्तरीय युवारंग युवक महोत्सव होत आहे. या महोत्सवासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून, ९० बाय १५० आकाराचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. उद‌्घाटन समारोपाचा कार्यक्रम वगळता एकाच वेळेस पाच ठिकाणी विविध कार्यक्रम सादर होतील. या महोत्सवाचा २० जानेवारीला समारोप होणार आहे. या वेळी ‘युवारंग’चे समन्वयक उपप्राचार्य डॉ.महेंद्रसिंग रघुवंशी, प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव, प्रा.एन.एन.मराठे अादी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा युवारंग महाेत्सव घेण्यामागील उद्देश असून, तो सफल झाल्याने महोत्सवाला दरवर्षी प्रतिसाद वाढत अाहे.