आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भुसावळ: दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पातील संच क्रमांक चारची अंतिम चाचणी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे संच क्रमांक पाचची अंतिम चाचणीही जवळ आली, असे असतानाही ओझरखेडा धरणाचे काम रखडलेलेच आहे. याशिवाय कोळसा पुरवठय़ासाठी असणार्या लोहमार्गाचे कामही अजून अपूर्ण असल्यामुळे प्रत्यक्ष व्यावसायिक तत्त्वावरील वीजनिर्मिती रखडली आहे.
सध्या दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील दोन संचांतून वीजनिर्मिती होत आहे. मात्र, विस्तारीत प्रकल्पातील संच क्रमांक चार आणि पाचमधून अजूनही व्यावसायिक तत्त्वावर वीजनिर्मिती झालेली नाही. संच क्रमांक चारमधून सध्या 170 मेगाव्ॉट वीजनिर्मिती होत आहे. त्यासाठी तापीनदीच्या पात्रातून पाणी उचलण्यात येत आहे. महाजनकोचे वरिष्ठ अधिकार्यांकडून दीपनगरला लवकरच वीजनिर्मिती होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यासाठी अजूनही मुबलक प्रमाणात कोळसा आणि पाणीच उपलब्ध नसल्यामुळे वीजनिर्मिती कशी होईल हा प्रo्न अजूनही अनुत्तरीतच आहे. ओझरखेडा धरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. हतनूर धरणातून पुराचे वाहून जाणारे पाणी उचलून ओझरखेडा धरणात टाकण्यात येणार आहे. मात्र, सध्या ओझरखेडा धरणाच्या पाइपलाइनचे कामही पूर्ण झाले नसल्याने पावसाळ्यात धरण भरेल किंवा नाही, याची शाश्वती नाही. परिणामी हतनूर धरणातून वीजनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पाणी आरक्षणाच्या दुप्पट पाणी उचलले जाणार आहे. तसेच कोळसा वाहतुकीसाठी निर्माण करण्यात येणार्या रेल्वे लाइनचे काम देखील पिंप्रीसेकम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. यामुळे कोळशाची उपलब्धी कोठून होईल, याबाबतही साशंकताच आहे. दीपनगर औष्णिक वीज केंद्र ते विस्तारीत प्रकल्प दरम्यान कन्व्हेअर बेल्ट उभारण्यात आला आहे. यावरून सध्या कोळशाची वाहतूक होत आहे. मात्र आगामी काळात दोन्ही 500 मेगावॉटचे संच सुरू झाल्यास कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मिती निश्चितच बंद होईल. यामुळे महाजनको प्रशासन प्रत्यक्ष वीजनिर्मितीसाठी प्रय}च करीत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.