आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगरमधील संच पाचच्या चाचणीला कोळशाअभावी ब्रेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगरच्या विस्तारीत प्रकल्पातील संच क्रमांक चार एक महिन्याच्या तांत्रिक दुरुस्तीनंतर चार दिवसांपूर्वीच सुरू झाला. यातून चाचणीदरम्यान वीजनिर्मिती सुरू आहे. मात्र, संच क्रमांक पाचचा तिढा अजूनही कायम आहे. पिंप्रीसेकमवासीयांच्या विविध मागण्या कायम असल्याने रेल्वेरुळांचे काम अपूर्ण आहे. यामुळे कोळशाची उपलब्धी होत नसल्याने संच पाचच्या चाचणीच्या महत्त्वपूर्ण कामाला ब्रेक लागला आहे.
दीपनगरच्या विस्तारीत प्रकल्पातील संच चारच्या टर्बाइनमधील एक्सरायडर फॅन नादुरुस्त झाला होता. विस्तारीत प्रकल्पातील हा फॅन मागणी करूनदेखील मिळत नव्हता. यामुळे छत्तीसगड वीजनिर्मिती निगम लिमिटेडकडून तो एक वर्षाच्या करारावर मागविण्यात आला आहे. दरम्यान, आता संच क्रमांक चारची दुरुस्ती करण्यात आली असून यातून 270 मेगाव्ॉट वीजनिर्मिती होत आहे. चाचणीदरम्यान तयार होणारी वीज नॅशनल सेक्टरच्या ग्रीड लाइनला जोडण्यात आली आहे. मात्र, संच क्रमांक पाचचे संपूर्ण काम होऊनही अजून साध्या चाचणीचेही काम सुरू करण्यात आलेले नाही. मध्यंतरी पिंप्रीसेकमवासीयांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. यामुळे रेल्वेरुळांचे काम रखडले आहे. फुलगाव येथील रेल्वे गेटचा तिढा देखील कायम असल्याने नवीन वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाची पुरेशी उपलब्धी नाही. 1000 हजार मेगाव्ॉट वीजनिर्मितीसाठी दररोज चार ते पाच रॅक कोळशाची गरज भासणार आहे.
मात्र, रेल्वे लाइनच तयार नसल्याने जेमतेम संच चारची चाचणी होईल एवढाच कोळसा मिळत आहे. आगामी काळात पावसाळ्यात ओल्या कोळशाचे प्रमाण वाढल्यास वीजनिर्मिती केंद्राला उष्मांक वाढविण्यासाठी अधिक कोळसा जाळावा लागेल. यामुळे नवीन प्रकल्पाला कोळशाची अडचण सहन करावी लागणार आहे.
किरकोळ प्रश्नांमुळे उशीर - दीपनगर वीजनिर्मितीचे विस्तारीत संच किरकोळ करणासाठी सुरू होत नसल्याचे दिसून येते. पिंप्रीसेकमवासीयांच्या मागण्या केवळ एक कोटी रुपयांच्या निधीत पूर्ण होऊ शकतात. मात्र, विलंबामुळे महाजनकोचे एक हजार मेगाव्ॉटचे वीज उत्पादन होत नसल्याने दररोज 6 कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरातील गावांच्या मागण्या मान्य झाल्यास रेल्वेरुळांचे काम पूर्ण होऊन मुबलक कोळसा मिळेल. मात्र, यासाठी महाजनकोचा पुढाकार आवश्यक आहे.
मदत कुठपर्यंत - वीजनिर्मितीसाठी कोळसा हे प्रमुख इंधन आहे. दीपनगर प्रकल्पात आंध्रप्रदेश आणि विदर्भातून कोळसा येणार आहे. सध्या मात्र वीजनिर्मिती केंद्रातील कोळसा हाताळणी विभागातून कन्हेअर बेल्टच्या सहायाने कोळसा मागविण्यात येतो. मात्र, संच क्रमांक पाचच्या चाचणीसाठी कोळशाची गरज भासणार असल्याने महाजनकोने त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.
प्रश्न मार्गी लागतील - दीपनगर विस्तारीत प्रकल्पातील संच चारची चाचणी पूर्ण झाल्यावर पाचची चाचणी हाती घेवू. सध्या कोळशाची समस्या असली तरी गरज भागेल एवढा कोळसा दररोज उपलब्ध होतो. रेल्वेरुळांचे काम पूर्ण झाल्यावर प्रकल्पाला मुबलक कोळसा उपलब्ध होईल. हा प्रo्न देखील मार्गी लावण्यासाठी महाजनको प्रयत्नशील आहे. व्ही.एस.खटारे, मुख्य अभियंता, दीपनगर