आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगरचा संच तीन आज पूर्ववत होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक तीनमधील टर्बाइनचा स्टिमलाइनचा हायप्रेशर व्हॉल्व्ह दोन दिवसांपूर्वी नादुरुस्त झाल्याने वीजनिर्मिती रखडली आहे. गुरुवारी या संचातून पुन्हा वीजनिर्मिती होणे अपेक्षित असून पावसाळ्यातील वार्षिक देखभालीपूर्वीच हा मोठा बिघाड झाल्याने वीजनिर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा आला.
दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक तीनमधून उन्हाळ्यात उच्चांकी वीजनिर्मिती झाली. पावसाळ्याच्या सुरवातीलाच सोमवारी रात्री दोनच्या सुमारास एस. पी. बायपास हायप्रेशर स्टिमलाइनचा व्हॉल्व्ह अचानक नादुरुस्त झाला. टर्बाइन गरम असल्याने तीन दिवसांनी त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येते. बुधवारी दिवसभर तांत्रिक दोष काढण्यात आले. यामुळे संच क्रमांक तीनमधून गुरुवारी वीजनिर्मिती पूर्ववत होणार आहे. संच क्रमांक दोनचे मागील वर्षी देखभाल दुरुस्ती करण्यात आली होती.
पुढील महिन्यात संच क्रमांक दोनची वार्षिक दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दरम्यान संच 45 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीत या संचातील सर्वच भागांची डागडुजी करण्यात येते. दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वीच संच क्रमांक तीनमध्ये मोठा बिघाड झाला आहे. यामुळे पावसाळ्यातील देखभालीचे काम यंदा लवकर सुरू होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, हा संच आता गुरुवारी पूर्ववत सुरू झाल्यानंतर वीजनिर्मिती होणार आहे.
तीन दिवसात काम पूर्ण - हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने संच बंद ठेवावा लागला. टर्बाइन गरम असल्याने तत्काळ काम करणे शक्य होत नाही. एस. पी. बायपास प्रकारातील स्टिमलाइनचा बिघाड असल्याने संच शटडाउन करावा लागला. तीन दिवसांचे काम पूर्ण झाल्यावर तो गुरुवारी कार्यान्वित करण्यात येईल. एल. बी. चौधरी, उपमुख्य अभियंता दीपनगर