आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपनगर संच तीन वार्षिक देखभालीसाठी बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक तीन बुधवारपासून वार्षिक देखभालीसाठी (कॅपीटल ओव्हर ऑलिंग) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, दीपनगरच्या विस्तारीत प्रकल्पातील संच क्रमांक चार सुद्धा ट्रिप झाल्याने आता केवळ संच दोनमधून 153 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याला 375 मेगाव्ॉटपर्यंत वीज देणार्‍या या केंद्रातून वीजनिर्मितीचे प्रमाण घटले आहे.

पावसाळ्यात निकृष्ट आणि मातीमिर्शीत कोळशाने वीजनिर्मितीत घट झाली आहे. 25 जुलैला संच क्रमांक तीनची वार्षिक देखभाल करण्यात येणार होती. यापूर्वी 23 जुलैला संच तीन बॉयलर ट्युब लिकेज झाल्याने बंद होता. यामुळे 23 जुलै पासूनच वार्षिक देखभाल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यांनतर मात्र राज्यातील वीजनिर्मिती घटल्याने संच तीन सुरुच ठेवावा, असा निर्णय झाला. मात्र, संच तीन वेळोवेळी बंद होऊन खर्च वाढत असल्याने या संचाच्या वार्षिक देखभालीची गरज पुढे आली होती. 1 ऑगस्टपासून या कामाला सुरुवात करण्यात आली. 35 दिवस या संचाच्या बॉयलर, जनरेटर, बॉयलरचे ट्युब, ऑईलिंगची कामे होणार आहेत.
संच दोनचीही तयारी - मागील वर्षी वार्षिक देखभाल करण्यात आलेला संच दोनचा लोडही आता कमी झाला आहे. पूर्ण क्षमतेनेही चालविल्यास यातून 160 मेगावॅटच्या वर लोड जात नाही. यामुळे या संचाची वार्षिक देखभाल करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोंबर किंवा सप्टेंबरमध्ये हे काम होण्याची शक्यता आहे.

35 दिवस संच बंद - संच तीन 35 दिवसांसाठी बंद राहणार आहे. वार्षिक देखभालीनंतर या संचातून 200 ते 205 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येईल. कोळशाची गुणवत्ता चांगली असेल तर वीजनिर्मितीची प्रक्रिया सुलभ होते. एल.बी.चौधरी, उपमुख्य अभियंता, दीपनगर