आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगर औष्णिक प्रकल्पातील अ‍ॅक्शन प्लॅन धूळ खात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- प्रदूषणावर मात करण्यासाठी दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने सहा महिन्यांपूर्वी प्रकाशगड मुख्य कार्यालयाकडे ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र, मंजुरीअभावी हा प्लॅन अजूनही धूळखात पडला आहे.

सध्या केंद्रातील चिमणीत इएसपी (इलेक्ट्रोस्टिक प्रेसिपिकेटर) न बसवताच वीजनिर्मिती होते. दुसरीकडे फ्लायअँश चिमणीतून बाहेर निघू नये म्हणून अमोनिया डोझिंगचे प्रयोग राबवले जातात. यामुळे वातावरणाचे आरोग्य बिघडले आहे. त्यातच राखेची पाइपलाइन वारंवार फुटून शेतीशिवारात राखेचा शिरकाव होतो. वेल्हाळे तलाव, जांभुळनाला, मोहंमदपुर्‍याच्या नाल्यात अडकलेली राख आणि चिमणीतून होणार्‍या राखेच्या वर्षावामुळे दीपनगनचे प्रदूषण मानवी जीवनास हानिकारक ठरत आहे. वेल्हाळे ग्रामस्थांनी तलावातील राख काढण्यासाठी 26 जानेवारीला जलसमाधी आंदोलन केले होते. या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक आशिष शर्मा, तत्कालीन मुख्य अभियंता मनोहर गोडवे यांनी एक महिन्याच्या आत राख काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, आश्वासनपूर्ती अजूनही झालेली नाही.