आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगरातील सेलो यंत्रणा आजारी; कोट्यवधी रुपयांचा चुराडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- दीपनगर विस्तारित प्रकल्पातील एएचपी विभागातील सेलो यंत्रणा वर्षभरापासून आजारी आहे. कोट्यवधी रुपयांची उपकरणे केवळ ठेकेदारांवर नियंत्रण नसल्याने कार्यशील नाहीत. या मुळे परिसरातील गावांना मात्र विनाकारण प्रदूषणाचा सामना करावा लागतो.
राख हाताळणी विभागातील सेलो यंत्रणेतून राख पल्करमध्ये भरली जाते. मात्र, गेल्या वर्षापासून ही यंत्रणा कार्यान्वित नाही. बिघाडामुळे राख बाहेर निघण्याचे प्रमाण अधिक असल्याने पिंप्रीसेकम गावावर अक्षरश: राखेचा पाऊस पडतो. याच प्रमुख कारणाने पिंप्रीसेकमवासीयांनी अनेकवेळा आंदोलने केली. दरम्यान, अजून सुद्धा ही यंत्रणा पूर्णपणे कार्यरत नाही. कोसळलेले हॉपर दुरुस्ती करतानाच सेलो यंत्रणा कार्यान्वित झाल्यास प्रदूषणाचा निपटारा करता येईल.
महाजनको प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सेलो यंत्रणा उभारली आहे. मात्र, काही ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट कामांचा फटका या यंत्रणेला बसला आहे. सयंत्रांतील बिघाडामुळे हॉपर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीपीआरआयच्या तज्ज्ञांनी यासंदर्भात पाहणी केली आहे. दरम्यान, सेलो यंत्रणा कार्यान्वित न झाल्यास प्रदूषणात वाढ, प्रकल्पातील राख हताळणी विभागात अपघातांचे प्रमाण वाढणे शक्य आहे.
यंत्रणा होईल कार्यान्वित
सेलो यंत्रणेमध्ये असलेल्या तांत्रिक बाबी प्रशासनाच्या समोर आल्या आहेत. यावर भविष्यात उपाययोजना होतील. सेलोबाबतची संपूर्ण माहिती आणि तक्रारी वरिष्ठांना कळवल्या आहेत. एल.बी.चौधरी, उपमुख्य अभियंता, दीपनगर
कधीतरी संवेदनशीलता दाखवा
दीपनगर प्रकल्पामुळे होणार्‍या प्रदूषणाबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवतो. मात्र, ज्या भागात प्रकल्प आहे, त्या परिसराप्रती अधिकार्‍यांनी कधीतरी संवेदनशीलता दाखवणे अपेक्षित आहे. राजेंद्र चौधरी, सदस्य, जिल्हा परिषद