आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळशाचे दोन डबे घसरले; दीपनगरच्या वीज प्रकल्पातील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर येथील विस्तारित वीज प्रकल्पातील 500 बाय दोनच्या नवीन रेल्वे ट्रॅकवर कोळसा वाहतूक करणारे दोन डबे रुळांवरून घसरले. या प्रकाराने रेल्वे रुळांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला रेल्वेद्वारे कोळसा पुरवण्यासाठी वरणगाव, फुलगाव ते दीपनगर यार्ड असा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. विदर्भातून येणारा कोळसा याच मार्गाने दीपनगरात आणला जातो. रेल्वे प्रशासनाकडून यार्डात कोळशाचे व्ॉगन सोडून दिले जातात. यानंतर आवश्यकतेनुसार किंवा मजुरांच्या उपलब्धतेनुसार कोळशाचे व्ॉगन रिकामे केले जाते. यासाठी महाजनकोकडे स्वत:च्या मालकीचे रेल्वे इंजीन आहे. मात्र, हे रेल्वे इंजीन अक्षरश: ठेकेदाराकडे काम करणार्‍या व्यक्तीच्या हाती देऊन कोळसा अनलोडिंग केला जातो. शिकाऊ रेल्वे इंजीन चालक आणि रेल्वे रुळांचे काम गुणवत्तापूर्वक न झाल्याने कोळशाचे वॉगन्स रुळांवरून घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दीड महिन्यांपूर्वी कोळशाने भरलेला डबा रुळांवरून घसरला होता. बुधवारी सकाळी कोळसा अनलोडिंग करून डबे जोडणी करताना अचानक वेग वाढल्याने दोन डबे रुळांच्या खाली उतरले. या डब्यांमध्ये कोळसा नसल्याने पाच तासांत ते पुन्हा रुळांवर ठेवण्यात आले.

निकृष्ट रुळांमुळे हे अपघात सातत्याने होत असतात. या मुळे रेल्वेच्या वॉगन्सचे नुकसान होते. या नुकसान भरपाईपोटी रेल्वे प्रशासन महाजनकोकडून भरपाई वसुली करते. ठेकेदारांच्या मजुरांकडून होणारे नुकसानाची जबाबदारी महाजनको प्रशासनाला घेण्याची वेळ येते. दरम्यान कोळसा वाहतुकीचे डबे कोसळल्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनाही पूर्णपणे माहिती नव्हती, हे विशेष.