आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगर: लोहमार्ग तयार, मात्र कोळसा येईना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दीपनगर विस्तारित प्रकल्पातील दोन्ही संचांना दररोज किमान 7 मेट्रीक टन कोळसा लागतो. यासाठी वरणगाव-फुलगाव मार्गाने नवीन लोहमार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावरून कोळसा वाहतूक होत नसल्याने विस्तारित प्रकल्पातील 1 हजार मेगाव्ॉट वीजनिर्मितीपासून राज्याला मुकावे लागते.

दीपनगर औष्णिक विस्तारित प्रकल्पातील संच क्रमांक चार आणि पाच हे 500 मेगाव्ॉट स्थापित क्षमतेचे आहेत. यासाठी मोठय़ा प्रमाणात कोळसा लागतो. या कोळशाची जुन्या वीजनिर्मिती केंद्राच्या मार्गावरून वाहतूक केली जाते. ही दगदग टाळण्यासाठी महाजनको कंपनीने लोहमार्गाच्या कामासाठी 300 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च केला. मात्र, संच क्रमांक चारमधून व्यावसायिक वीजनिर्मिती सुरू होऊनही या प्रकल्पाला कोळसा मिळत नसल्याची स्थिती आहे. सध्या दीपनगरच्या जुन्या प्रकल्पातून नवीन प्रकल्पात कोळसा पाठवला जातो. कोळसा वाहतुकीतून लाखो रुपयांचा खर्च होतो. मात्र, लोहमार्गास तांत्रिक अडथळे निर्माण करून वाहतुकीतून खर्च लाटण्याचे प्रकार सुरू असल्याची प्रकल्प परिसरात चर्चा आहे.

दीपनगर विस्तारित प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती झाल्यास राज्याला खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याचे प्रमाण कमी होईल. मात्र, यासाठी गुणवत्तापूर्ण कोळसा मुबलक प्रमाणात मिळणे आवश्यक आहे.