आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्तारित प्रकल्पाला फेब्रुवारीत मिळणार मुबलक कोळसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दीपनगर औष्णिक वीजनिर्मितीच्या विस्तारित प्रकल्पात कोळसा वाहून नेण्यासाठी सुरू असलेल्या लोहमार्गाचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. पूर्ण क्षमतेने वीजनिर्मितीसाठी मार्च महिना उजाडणार आहे. कोळशाचा साठा मुबलक नसल्याने प्रकल्पातील एखादा संच बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आणि विस्तारित प्रकल्पातील चारही संच पूर्ण क्षमतेने सुरू राहिल्यास राज्याला 1420 मेगाव्ॉट वीज मिळेल. सध्या दररोज आवश्यक असलेल्या किमान 11 हजार मेट्रीक टन कोळशापैकी केवळ 6 ते 9 हजार मेट्रीक टन कोळसा मिळत आहे. यामुळे चारही संच सुस्थितीत असतानादेखील कोळसा नसल्याने ते पूर्ण क्षमतेने चालू शकत नाही. गेल्या दोन दिवसांपूर्वी विस्तारित प्रकल्पातील संच क्रमांक चार तांत्रिक कारणांनी बंद करण्यात आला होता. सोमवारी सकाळी हा संच लाइटअप करण्यात येईल. सोमवारी रात्री यातून वीजनिर्मिती होणे शक्य आहे. नवीन विस्तारित प्रकल्पासाठी वरणगाव, फुलगाव मार्गे लोहमार्ग तयार केला आहे. महाजनकोने लोहमार्गाचे काम पूर्ण केले. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने तांत्रिक अडचणींमुळे सिग्नल यंत्रणा पूर्णपणे उभारली नसल्याने कोळशाची वाहतूक पूर्ण होऊ शकली नाही. केंद्रात अजूनही जुन्या मार्गानेच कोळशाची वाहतूक केली जाते. वीजनिर्मिती केंद्रात प्रामुख्याने विदर्भातून कोळशाची आयात होते. भुसावळ रेल्वे यार्डात कोळशाचा रॅक वळवून पुन्हा दीपनगर केंद्रात नेण्याच्या वेळेत इतर रेल्वेगाड्यांचे नियोजन कोलमडते. यामुळे वीजनिर्मिती केंद्राला दररोज केवळ दोन ते तीन रॅक कोळसा पुरविला जातो.