आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपनगर औष्णिक प्रकल्प: सीओडी चाचणीचा घाट अंगलट येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दीपनगर औष्णिक विस्तारित वीजनिर्मिती प्रकल्पातील संच क्रमांक चारची नियमानुसार चाचणी न घेता कर्मशिअल ऑपरेशन डिक्लेरेशन (सीओडी) करण्यात आली. आता या संचात अनेक प्रकारच्या त्रुटी शिल्लक राहिल्याने भेल आणि टाटा पॉवर लिमिटेड या कंपन्यांची कामे महाजनको प्रशासनला करावी लागणार आहेत.

सीओडीनंतरही या संचातून पूर्ण क्षमतेने अर्थात 500 मेगाव्ॉटपर्यंत वीजनिर्मिती झाली नसल्याने ही बाब समोर आली. आता हा प्रकार काही अधिकार्‍यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. विस्तारित वीजनिर्मिती प्रकल्पातील संच क्रमांक चारची सीओडी 11 नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आली. तेव्हापासून या संचातून व्यावसायिक वीजनिर्मिती केली जात आहे. दरम्यान, यासाठी 28 दिवसांची सीओडी चाचणी कधी झाली? याबाबत पर्यावरणप्रेमींनी मुंबईच्या प्रकाशगड कार्यालयात माहितीच्या अधिकारातून विचारणा केली आहे. यासह 72 तास संच पूर्ण क्षमतेने अर्थात 500 मेगाव्ॉट क्षमतेने सुरू राहणे आवश्यक असते. मात्र, अशी कोणतीही चाचणी न करताच या संचांतून व्यावसायिक वीजनिर्मितीची सुरुवात झाली. 10 फेब्रुवारीला संच क्रमांक चारच्या कोळसा हाताळणी विभागात रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले. विशेष म्हणजे कार्यकारी संचालक ए.आर.नंदनवार यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडला. माहिती अधिकारातून प्रश्नांची सरबत्ती झाल्याने आता सीओडी झाल्यावर हा विषय पुन्हा गाजण्याची चिन्हे आहेत.