आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भुसावळ - दीपनगर केंद्रातील दोन्ही संचांसाठी आयात कोळसा न वापरण्याचे अलिखित आदेश मुंबई येथील प्रकाशगड कार्यालयातून निघाले आहेत. यामुळे सध्या निकृष्ट प्रतिच्या एफ ग्रेडच्या कोळशाद्वारे वापर सुरू आहे. परिणामी गेल्या पंधरवड्यापासून दीपनगर केंद्राच्या आजूबाजूचा भाग अक्षरक्ष: राखेने माखला आहे.
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या परिसरातील गावांना गेल्या पंधरवड्यापासून राखेचा सामना करावा लागत आहे. चिमणी आणि हॉपरमधून उडणारी फ्लॉय अँश परिसरातील पाच ते सात किलोमीटरच्या गावांना बाधित करीत आहेत. चिमणीतून निघणारी राख पिंप्रीसेकम, फुलगाव, अंजनसोंडे आणि कठोरा बुद्रूक, कठोरा खुर्द या गावांच्या शेतीशिवार आणि घरांवर पडते. दीपनगर केंद्रातील संच क्रमांक दोन आणि तीनमध्ये यापूर्वी आयात कोळशाचा 20 टक्के या प्रमाणात वापर करण्यात येत होता. मात्र, प्रकाशगड कार्यालयातून विस्तारित संचांमध्ये आयात कोळशाचा वापर करण्यात येऊ नये, असे तोंडी सूचना निघाल्या आहेत. महाजनको कंपनीची ही धरसोड वृत्ती प्रकल्प परिसरातील शेती आणि पर्यावरणाच्या मुळावर उठली आहे. त्यामुळे भविष्यात आंदोलनाची शक्यता आहे.
राखेचे बसले थर - जुन्या संचाप्रमाणेच विस्तारित संचांमुळे निकृष्ट कोळसा जाळल्याने चिमणीतून उडणारी राख शेतातील उभ्या असलेल्या पिकांवर बसली आहे. केळीसोबत भाजीपाला पिकांना फटका बसला असून राखेचे थर साचल्याने प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावली आहे.
गुन्हे दाखल करा - दीपनगरच्या प्रदूषणाबाबत मुख्य अभियंता मनोहर गोडवे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. मात्र, त्यांनी स्वत: पाहणी केली नाही. निकृष्ट कोळसा जाळून प्रदूषण करणार्या महाजनकोच्या अधिकार्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हे दाखल करावे. राजेंद्र चौधरी, सदस्य, जिल्हा परिषद
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.