आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगर केंद्रातील संच क्रमांक कार्यान्वित, महिनाभराने दिलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात १२ हजार मेगावॅटवर असलेली राज्याची वीज मागणी आता १८ हजार ४३४ मेगावॅटवर गेली आहे. तर महावितरणची वीजमागणी १५ हजार ३७५ मेगावॅटवर पोहोचली आहे. यामुळे महिनाभरापासून ठप्प असलेली दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील निर्मिती सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी संच क्रमांक चार कार्यान्वित झाला असून दोन दिवसांत ५०० मेगावॅटचा संच क्रमांक पाच कार्यान्वित होईल, असे संकेत आहेत. दीपनगरातील संच कार्यान्वित होण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने सातत्याने पाठपुरावा केला.

दीपनगर केंद्रातील संच १७ सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले होते. यापूर्वीही ४७ दिवस संच बंद असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान शासनाने केलेला पीपीए (पॉवर पर्चेस अॅग्रीमेंट) रद्द करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱी संघटनांनी आंदोलन केले होते. अखेर ऑक्टोबर हिटमुळे राज्याची विजेची मागणी वाढली. यामुळे गुरुवारी संच क्रमांक चार कार्यान्वित करण्याबाबत सकाळी आदेश प्राप्त झाले. यानुसार सायंकाळी संच क्रमांक चारमधून वीजनिर्मिती पूर्ववत सुरू करण्यात आली. आगामी काळात विजेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे दीपनगरातील ५०० मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक पाच, २१० मेगावॅटचा स्थापित क्षमतेचा संच क्रमांक तीन कार्यान्वित होण्याचे संकेत आहेत. दीपनगरातील सर्व संच ठप्प असल्याने रोजंदारी आणि कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. दीपनगरच्या अॅशवर अवंलबून असलेला नशिराबाद येथील ओरिएंट सिमेंट उद्योग महिनाभरानंतर सुरू होईल.

वीज मागणीत होतेय वाढ
वीज मागणी दिवसेंदिवसवाढत आहे. यामुळे बंद असलेले वीजसंच कार्यान्वित केले जात आहेत. ५०० मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक पाच येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू होईल. यानंतरच्या काळात २१० मेगावॅटच्या संच क्रमांक तीनला कार्यान्वित करण्याबाबत विचार होऊ शकतो. - अभय हरणे, मुख्य अभियंता, दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र
बातम्या आणखी आहेत...