आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepnagar Thermal Power Station News In Marathi, Electricity, Divya Marathi

दीपनगरमध्ये संच बिघाडाचे सत्र थांबेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर औष्णिक केंद्रात संचांमधील बिघाडाचे सत्र थांबण्यास तयार नाही. संच क्रमांक दोन व पाचच्या दुरुस्तीनंतर वीजनिर्मिती पूर्ववत होण्यापूर्वीच संच चार बंद ठेवण्यात आला आहे. या मुळे 1420 मेगावॉट स्थापित क्षमतेच्या केंद्रातून 497 म्हणजेच 35 टक्के वीजनिर्मिती झाली.


दीपनगर केंद्रात गेल्या शनिवारी संच क्रमांक दोन एक्सारायडर फॅनच्या बिघाडामुळे बंद झाला. यापाठोपाठ रविवारी संच क्रमांक पाचही तांत्रिक कारणांमुळे बंद पडला. मंगळवारी एक्सरायडर फॅनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन संच दोन लाइटअप झाला. दुपारी या संचातून राज्याला 53 मेगावॉट वीज मिळाली. यादरम्यान सर्वाधिक वीजनिर्मिती करणारा संच क्रमांक चारमध्ये अचानक बिघाड झाल्याने तो बंद झाला. या मुळे 1420 मेगावॉट स्थापित क्षमतेच्या दीपनगर केंद्रातून केवळ 497 मेगावॉट वीज मिळाली. संच क्रमांक पाचमधून मात्र सर्वाधिक 329 मेगावॉट वीजनिर्मिती झाली. राज्याची वीज मागणी तब्बल 18 हजार मेगावॉट, तर वीज वितरण कंपनीची मागणी 16 हजार मेगावॉटच्या उंबरठय़ावर आहे. हा टप्पा ओलांडल्यास महाराष्ट्र शासनावर खासगी कंपन्यांकडून जास्त दराने वीज विकत घेण्याची वेळ येईल.